Home क्राईम वृद्धाचा दगडाने ठेचून खून

वृद्धाचा दगडाने ठेचून खून

0 second read
0
0
104

no images were found

वृद्धाचा दगडाने ठेचून खून

चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चारगाव- वायगाव मार्गावरील झुडुपात शुक्रवारी एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताचे नाव सदाशिव महाकुळकर असे आहे. तो भेंडाळा येथील रहिवासी असून शरीरावरील जखमांवरून त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केले असून तपास सुरू आहे.

न्यायालयीन काम असल्याचे सांगून वायगाव येथील नातेवाईकांकडे जात असल्याचे सांगून सदाशिव महाकुळकर गुरूवारी सकाळी हा घराबाहेर पडला होता. तो आपल्या घरी पोहोचला नाही. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास चारगाव वायगाव मार्गावरील झुडुपात त्याचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. या घटनेची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार अविनाश मेश्राम हे तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कसबा बावडा नागरी आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र

कसबा बावडा नागरी आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र : राष्ट्रीय गुणवत्ता आश्वा…