
no images were found
पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठक
पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक घेतली.
पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक घेतली. आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत. राज ठाकरेंनी पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने सध्या कामाला लागण्याच्या सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. ही बैठक राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राजमहल येथे पार पडली.