no images were found
पक्षानं दिलेली जबाबदारी कृष्णराज सक्षमपणे पेलतील, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास
कोल्हापूर (प्रतिनिधी):युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांची भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि मित्रमंडळींनी आनंद व्यक्त केला. तर खासदार धनंजय महाडिक यांनी कृष्णराज महाडिक त्यांच्यावरील जबाबदारी योग्य प्रकारे पेलतील आणि नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवतील, अशी प्रतिक्रिया दिली.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपनं शतप्रतिशत यश मिळवलंय. या निवडणुकांनंतर भाजपनं आता संघटनात्मक बांधणीला प्राधान्य दिलंय. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज संघटनात्मक कार्यकारिणी जाहीर केलीय. त्यामध्ये कृष्णराज धनंजय महाडिक यांना भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्र विभागातून त्यांची ही निवड झालीय. कृष्णराज महाडिक यांच्यावर पक्षांनं विश्वास दाखवलाय. कृष्णराज युवा पिढीचं संघटन करुन, पक्ष बळकटीला हातभार लावतील आणि ही निवड सार्थ ठरवतील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील नेत्यांनी कृष्णराज महाडिक यांना सन्मानाचं पद देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, नामदार चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी खरा करून दाखवलाय. कृष्णराज महाडिक सामाजिक कार्यात अग्रेसर असून, यू ट्यूब ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी युवा पिढीवर प्रभाव टाकला आहे. त्यांच्या निवडीचं युवा पिढीकडून स्वागत करण्यात येतंय.