Home राजकीय भ्रष्टाचारी संस्थाचालकांवर कठोर कारवाई करा ! हेमंत पाटील 

भ्रष्टाचारी संस्थाचालकांवर कठोर कारवाई करा ! हेमंत पाटील 

8 second read
0
0
52

no images were found

भ्रष्टाचारी संस्थाचालकांवर कठोर कारवाई करा ! हेमंत पाटील 

 मुंबई :-धनगर समाजातील विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शिक्षण भ्रष्टाचारी संस्थाचालकांमुळे धोक्यात येऊ नये. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजने’चा गैरवापर करणाऱ्या संबंधित शाळांचे सखोल व निष्पक्ष पुर्नर्मूल्यांकन व्हावे, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.२५) केली. दोषी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

      धनगर समाजातील गुणवंत मुलांना नामांकित शाळांमध्ये शिकण्याची संधी देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवली जाते. २०२४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना राहणे, जेवण आणि दर्जेदार इंग्रजी शिक्षण मोफत पुरवले जाते. या महत्वाकांक्षी योजनेचा गैरवापर करीत संस्थाचालक त्यांचे घर भरत असतील तर ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. 

     कागदोपत्री विद्यार्थ्यांची संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचा निधी लाटल्याचा ठपका ज्या २५ शाळांवर ठेवण्यात आला आहे, तो सिद्ध झाल्यास त्यांची मान्यता कायमस्वरूपी रद्दबातल करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शिक्षण हे कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारी संस्थाचालका मुळे बाधित होता कामा नये, याची काळजी सरकारने घ्यावी.अनेक विद्यार्थी या निवासी शाळांवर अवलंबून आहेत. त्यामुळे कोणतीही कारवाई करताना विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च मानले जावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…