Home राजकीय युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडं भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पदाची जबाबदारी, 

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडं भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पदाची जबाबदारी, 

5 second read
0
0
17

no images were found

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडं भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पदाची जबाबदारी, 

कोल्हापूर (प्रतिनिधी):भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून, पक्षाच्या नव्या पदाधिकार्‍यांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांना भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. याशिवाय राज्यातील प्रत्येक विभागाच्या उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष, प्रवक्ता यांच्याही नावांची घोषणा झाली. दरम्यान कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पक्षाचा आदेश मान्य करत, संयम दाखवल्याचं बक्षिस म्हणून कृष्णराज महाडिक यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आलीय.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मंुंबईत पत्रकार परिषद घेवून, राज्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये मुख्य प्रवक्ता म्हणून मुंबईतून नवनाथ बन यांची नियुक्ती झाली. तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कौडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रविण पोटे, गोपीचंद पडळकर, सुजय विखे, प्रिया शिंदे, अर्चना पाटील-चाकुरकर, चैतन्य बापू देशमुख यांचा समावेश आहे. याशिवाय युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडं भाजप नेतृत्वानं महत्वाची जबाबदारी सोपवली. कृष्णराज महाडिक यांना युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून घोषीत करण्यात आलंय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षाचा आदेश मान्य करून, कृष्णराज यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. पक्षादेश मान्य केल्याचं फळ म्हणून, आता कृष्णराज यांच्यावर युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. यापुढं युवकांना विधायक कार्यासाठी संघटीत करू आणि पक्षाची लोकहिताची ध्येयधोरणं आणि निर्णय जनमानसापर्यंत पोचवू, असं कृष्णराज महाडिक यांनी म्हंटलंय. जास्तीत जास्त तरूणांना भाजपमध्ये सहभागी करून घेवू, तरूणांचे प्रश्‍न सरकारपर्यंत पोचवू, असंही त्यांनी नमुद केलं. या निवडीबद्दल कृष्णराज महाडिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …