Home मनोरंजन शुभांगी अत्रेच्‍या पहिल्‍या टॅटूमधून दिसते पवित्र प्रतीक 

शुभांगी अत्रेच्‍या पहिल्‍या टॅटूमधून दिसते पवित्र प्रतीक 

1 min read
0
0
58

no images were found

शुभांगी अत्रेच्‍या पहिल्‍या टॅटूमधून दिसते पवित्र प्रतीक 

टॅटू आकर्षक डिझाइन्‍ससह काढले जातातजे व्‍यक्‍तींच्‍या मनामध्‍ये खास स्‍थान निर्माण करतात. या दीर्घकाळापर्यंत राहणाऱ्या कलाकृती महत्त्वाच्‍या व्‍यक्‍तीस्‍थान किंवा व्‍यक्‍तींच्‍या जीवनात अतूट छाप निर्माण केलेल्‍या अनुभवांची आठवण करून देतात. या बँडवॅगनमध्‍ये सामील होत आहे एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका भाबीजी घर पर हैमध्‍ये अंगूरी भाबीची भूमिका साकारण्‍यासाठी लोकप्रिय असलेल्‍या अभिनेत्री शुभांगी अत्रे. जवळपास १५ वर्षांनंतर अखेर अभिनेत्रीने टॅटू काढला आहेज्‍यामध्‍ये आध्‍यात्मिक अर्थ सामावलेला आहे. एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका भाबीजी घर पर हैमधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्‍हणाल्‍या, ”टॅटू हे स्‍वत:ला व्‍यक्‍त करण्‍याचे प्रबळ माध्‍यम आहे. जवळपास दोन दशकानंतर मी पहिला टॅटू काढला आहे. अनिश्चिततेला दूर करणाऱ्या फुलपाखरांपासून काळजीपूर्वक डिझाइनची निवड करण्‍यापर्यंत माझ्या ओळखीबाबत विशिष्‍ट स्‍टेटमेंट करणारा टॅटू काढण्‍यास प्रेरणा मिळाली. टॅटू माझ्यासोबत आजीवन राहणार असल्‍यामुळे त्‍याच्‍या महत्त्‍वाला अधिक प्राधान्‍य देण्‍यात आले. दीर्घकाळापासून वाट पाहत असलेला दिवस अखेर आला आणि मी सुंदर टॅटू काढलाज्‍यामध्‍ये ओम चिन्‍ह व कमळाचे संयोजन आहेज्‍यामधून सखोल अर्थ दिसून येतो. ओम हे भगवान शिवप्रती माझ्या भक्‍तीचे प्रतीक आहेतर कमळ उपचाराचे प्रतीक आहे. या प्रतीकांमधून योगाचे सार देखील दिसून येतेज्‍यामधून सतत माझे मानसिक व शारीरिक स्‍वास्‍थ्‍य उत्तम ठेवण्‍यास प्रेरणा मिळते. माझे या टॅटूने लक्ष वेधून घेतले आहेज्‍यामधून माझा आत्‍मविश्‍वास वाढला असून जीवनामध्‍ये नवीन उत्‍साह निर्माण झाला आहे.” 

शुभांगी यांची दीर्घकाळापासूनची इच्‍छा अखेर पूर्ण झाली आहेज्‍याचे श्रेय त्‍यांची मुलगी आशीला जाते. त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, ”आशी उच्‍च शिक्षणासाठी यूएसला जाणार होतीम्‍हणून ती यूएसला जाण्‍यापूर्वी मी तिच्‍यासोबत वेळ व्‍यतित केला. आम्‍ही दोघी गोव्‍याला देखील गेलोजेथे आशीमुळेच अखेर माझे टॅटू काढण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण झाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत …