no images were found
करण अदाणी यांनी एआयएमए च्या प्लॅटिनम ज्युबिली कार्यक्रमात गव्हर्नन्स, संरक्षण आणि वाढीच्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकला
नवी दिल्ली, : वेगाने विस्तार होत असताना राष्ट्रीय पायाभूत सुविधा प्राधान्यक्रम, संरक्षणाशी संबंधित परिसंस्था आणि अंतर्गत गव्हर्नन्स यावर लक्ष अधिक मजबूत करत असल्याचे करण अदाणी यांनी शनिवारी सांगितले.
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (एआयएमए ) च्या प्लॅटिनम ज्युबिली निमित्त आयोजित संवाद सत्रात बोलताना, अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीएसईझेड) चे व्यवस्थापकीय संचालक आणि अदाणी सिमेंट चे संचालक असलेले श्री. अदाणी यांनी समूहाच्या विकसित होत असलेल्या कॅपिटल अलोकेशन स्ट्रॅटेजीबद्दल माहिती दिली.
गौतम अदाणी यांचे ज्येष्ठ पुत्र असलेले श्री. अदाणी म्हणाले की, गुंतवणूक तीन मुख्य स्तंभांवर केंद्रित राहील — ऊर्जा, लॉजिस्टिक्स आणि भारताच्या विकासासाठी आवश्यक असलेली मूलभूत सामग्री. सिटी गॅस वितरण, वीज वहन नेटवर्क तसेच डेटा सेंटर्ससारख्या उदयोन्मुख डिजिटल मालमत्तांसह ऊर्जा पायाभूत सुविधा हा दीर्घकालीन फोकस राहील.
संरक्षण क्षेत्रातील सहभागाबाबत त्यांनी सांगितले की स्वदेशीकरण हा राष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक उद्देश आहे. ब्राझीलच्या एम्ब्रेअर सोबतची अलीकडील भागीदारीसह मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल (एमआरओ) क्षमता विकसित करण्यावर भर दिला जात आहे. हे देशांतर्गत उत्पादनाला जागतिक पुरवठा साखळीशी जोडणाऱ्या व्यापक एव्हिएशन आणि संरक्षण परिसंस्थेचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थात्मक आव्हानांबद्दल बोलताना श्री.अदाणी म्हणाले की,वेगवान विस्तारामुळे व्यवस्थापनाच्या स्तरांमध्ये वाढ झाली असून निर्णय प्रक्रियेचा वेग कमी झाला आहे. संरचनात्मक गुंतागुंत कमी करताना वेग आणि स्केलेबिलिटी पुन्हा प्रस्थापित करणे हे आता प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
समूह कर्मचाऱ्यांचे सरासरी वय सध्या 38 असून ते कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) स्वीकारण्याचा वेग वाढेल, असे त्यांनी सांगितले. याच आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या 100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक वचनबद्धतेचा उद्देश 2035 पर्यंत नवीकरणीय ऊर्जा आधारित पायाभूत सुविधा उभारणे हा असून त्यातून समूहाच्या दीर्घकालीन एआय आणि डिजिटल महत्त्वाकांक्षांनाही चालना मिळेल.
महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण आधीच्या 2 टक्क्यांवरून वाढून 15 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सुमारे 80 टक्के नेतृत्व संस्थेच्या आत विकसित झाले असून बंदरे, विमानतळ, सिमेंट आणि खाणकाम या व्यवसायांमध्ये अंतर्गत हालचालींना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नियामक तपासणी आणि माध्यमांतील बातम्यांनंतर गव्हर्नन्स आणि विश्वासार्हतेबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्री.अदाणी म्हणाले की मजबूत ऑपरेटिंग फंडामेंटल्स आणि पारदर्शक संवाद यावरच टिकाव अवलंबून असतो.
समूहाचे मुख्य पायाभूत सुविधा पोर्टफोलिओ हे पुनरावृत्ती होणाऱ्या महसुलामुळे संरचनात्मकदृष्ट्या मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र पूर्वी एकाग्रतेचा धोका असल्याची कबुलीही दिली. गव्हर्नन्स फ्रेमवर्क मजबूत करण्यासाठी संस्थात्मक पद्धती आणि व्यापक भागीदारी यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“आपला संदर्भ अधिक चांगल्या प्रकारे मांडण्याचीही गरज आहे,” असे ते म्हणाले. जागतिक बाजारपेठांमध्ये कथननिर्मिती (नॅरेटिव्ह बिल्डिंग) अधिक महत्त्वाची होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शाश्वततेबद्दल बोलताना पर्यावरणीय उपाययोजना नफा कमी करतात हा समज त्यांनी फेटाळून लावला. बंदरांमधील ट्रक फ्लीट यंदापासून डिझेलवरून ग्रीन फ्युएल पर्यायांकडे वळवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतामध्ये पुन्हा फॉर्म्युला वन (एफ-१) स्पर्धा सुरू करण्याबाबतही त्यांनी रस व्यक्त केला. बुद्ध इंटरनॅशनल सर्किट सहित जयपी समूहाशी संबंधित मालमत्ता अधिग्रहणानंतर, अशा उपक्रमाचा उद्देश जागतिक दर्जाचे मापदंड स्थापित करण्याचा असेल, असे त्यांनी सांगितले.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाची आठवण सांगताना श्री. अदाणी म्हणाले की त्यांनी Mundra Port येथे कोणत्याही विशेष सवलतीशिवाय प्रत्यक्ष काम केले, आणि त्या अनुभवाने त्यांच्या कामकाजाच्या दृष्टिकोनाला औपचारिक शिक्षणापेक्षा अधिक आकार दिला.
या संवाद सत्रात त्यांच्याशी चर्चा सुनील कांत मुंजाल, चेअरमन, हिरो एंटरप्राइझ आणि एआयएमए चे माजी अध्यक्ष यांनी केली.