Home Video भाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेध

भाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेध

7 second read
0
0
22

no images were found

भाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेध
कोल्हापूर(प्रतिनिधी): दिल्लीमध्ये भारत देशाच्या नेतृत्वात प्रतिष्ठित ग्लोबल AI समिटचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि नवीन विचाराचे लोक भारतात आले होते. भारत देशासाठी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण होता. परंतु या आनंदाच्या वेळी गुंड प्रवृत्तीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी समिटच्या ठिकाणी घुसखोरी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.याच निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महिला मोर्चा व युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा धिक्कार असो, राहुल गांधीचे करायचे काय खाली डोके वर पाय, देशद्रोही राहुल गांधी माफी मागा अशा घोषणा देऊन चौक दणाणून सोडला.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव बोलताना म्हणाले, भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या AI शिखर परिषदेला ८० हून अधिक देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्वांनी भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले पण कॉंग्रेसने गुंड प्रवृत्त्तीची लोक आणून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार देशद्रोहा सारखा आहे. AI आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची जगभर ओळख वाढत असताना काँग्रेसने अशा प्रकारचे वर्तन करणे अत्यंत चुकीचे आहे. झालेल्या प्रकाराचा भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने कॉंग्रेसचा जाहीर निषेध करतो.

यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नकाते, मेघाराणी जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नकाते, धनश्री तोडकर, संगीता खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजित पवार, नगरसेवक विशाल शिराळे, बबन मोकाशी, पूर्वा राणे, अर्चना कोराणे, नीलिमा पाटील, रेखा उगवे, दीपा ठाणेकर, माधुरी व्हटकर, सुशीला पाटील, संगीता मोरे, अशोक लोहार, भूषण कानकेकर, जयेश घरपणकर, पंकज बारड, निरंजन घाटगे, शिवानी पाटील, सीमा पालकर, अनिता ढवळे, रीमा पालनकर, तेजश्विनी पार्टे, अलका जावीर, रुपाली आगळे, अश्विनी वास्कर, सुजाता पाटील, शारदा पोटे, विशाखा कलशेट्टी, वंदना बंबलवाड, धीरज पाटील, अमेय भालकर, विवेक राजवर्धन, आदित्य पाटील, विकास माने, हर्षवर्धन पाटील ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…