
no images were found
हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्या याप्रकरणी आव्हाड ताब्यात
ठाणे : येथील विधियाना मॉलमधील हर हर महादेव चित्रपटाचा शो आव्हाड यांनी बंद पाडला. आव्हाड यांचे कार्यकर्ते मॉलमध्ये घुसले. मॉलमधील प्रेक्षकांना कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलं. एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. याप्रकरणी शंभर जणांवर गुन्हा दाखल झाला होता. जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई झाली आहे. मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं होतं.
या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तक्रार करण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शंभर जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्तक नगर पोलिसांकडून जितेंद्र आव्हाड यांची चौकशी सुरू आहे. ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना ताब्यात घेतले आहे. हर हर महादेव चित्रपट सुरू असताना प्रेक्षकांना मारहाण केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर आहे. चुकीचा इतिहास दाखविलेलं खपविलं जाणार नाही, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती.
कुणीही कायदा हातात घेत असेल, तर ते चुकीचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. चित्रपटाच्या दिग्दर्शकानंसुद्धा अशाप्रकारे प्रेक्षकांना मारहाण करणं चुकीचं असल्याचं म्हटंल होतं. दरम्यान, मनसेकडून काही फ्री शोचं आयोजन करण्यात आलं होतं. कोण हा शो थांबवून दाखवितो, असंदेखील मनसेकडून सांगण्यात आलं होतं. या चित्रपटाच्या शोवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आमनेसामने आली होती.