no images were found
आयर्विन ख्रिश्चन मैदानावर आली आहे कोल्हापूरकरांसाठी पर्वणी पाण्याखालील माशांचा बोगदा,अंडर वॉटर टनेल एक्स्पो
कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील आयर्विन ख्रिश्चन मैदानावर आलाय पाण्याखालील माशांचा बोगदा म्हणजेच अंडर वॉटर टनेल एक्स्पो याअंतर्गत पाहण्यास मिळत आहे माशांचा विविध जाती आणि लहाणांसह मोठ्यांना देखील याठिकाणी धमाल मस्ती आणि मनोरंजन होणार आहे.रेड गोल्ड फिश,ऑस्कर, सिल्व्हर गोल्ड, ब्लॅक गोल्ड, फिराना, टँटरा,लेझर, शार्क,कोईकर, अँलीगेटर, आरफामा आदी माशांच्या प्रजाती याठिकाणी पाहण्यास मिळत आहेत.अशी माहिती एक्सपोचे मॅनेजर जयराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केरळ येथील तज्ञ या सर्व माशांची काळजी घेतात. माशांचे खाद्य म्हणून चिकनचे तुकडे दिले जातात.याठिकाणी उभा करण्यात आलेला माशांचा हा बोगदा साधारण ८० फूट रुंद व २०० फूट लांब असा उभारलेला आहे. सर्वांच्याच मनोरंजनासाठी विविध आकर्षक खेळ आणि खाद्य व पेय यांची दुकाने आहेत. खरेदीसाठीही विविध दुकाने असून मनोरंजन नगरीचा आनंद घेऊ शकतो. परदेशी खेळसुद्धा आहेत. ज्याप्रमाणे मेरी गो राउंड, फिरता मनोरा, लहान मुलांची आगगाडी, लहान मुलांसाठीचे पाळणे, जपानी पाळणा त्यालाच ‘त्सुनामी पाळणा’ असे सुद्धा म्हणतात. या सर्व मनोरंजनांची वेळ सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत आहे.तरी कोल्हापूरकरांनी या मनोरंजन नगरीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पहिल्यांदाचं वातानुकूलित पाण्याखालील बोगद्यामध्ये मासे बसवण्यात आले आहेत.दुबईचा फिल कोल्हापूरच्या मातीत दिसून येत आहे. कडक उन्हाळा सुरू असून शाळेला सुटी लागली आहे. या सुट्टीत कोल्हापूरच्या बाळगोपाळासाठी आयर्विन ख्रिश्चन मैदानावर पाण्याखालचा बोगदा तयार करण्यात आला आहे. याठिकाणी धमाल मज्जा आणि आनंद घेता येणार आहे. येथे परदेशी खेळ आणि बरंच काही अनुभवता येणार आहे. पाच वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. तेथे गेल्यानंतर कोल्हापूर नव्हे तर दुबईचा फिल येतो, असे एक्सपोचे मॅनेजर यांनी सांगितले.
संपूर्ण जगातील विविध प्रकारच्या जिवंत माशांचे प्रदर्शन कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच सुरू केले आहे. दुबई शहराप्रमाणेच कोल्हापूर शहरात वातानुकूलित पाण्याखालील बोगदा तयार केला आहे. हे सर्व मासे काचेच्या मोठ्या अँक्वेरीमध्ये आहेत. २४ तास माशांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो.उन्हाळ्यात सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी बागा, मैदाने अपुरी पडतात. ऊन खाली झाल्यानंतर या मुलांना कधी आम्ही खेळणार असे वाटत असते म्हणूनच कोल्हापूरच्या मातीत मुलांच्या भेटीला आयर्विन ख्रिश्चन मैदानात एक्स्पो आला आहे. या एक्स्पोमध्ये जगभरातील विविध जातींच्या रंगीत जिवंत माशांच्या अनेक प्रजाती आपल्या कोल्हापूर शहरात पाहण्यास मिळत आहेत.तरी ३ जून पर्यंत सुरू राहणाऱ्या या अंडर वॉटर टनेल एक्सपो कोल्हापूरकरांना अवश्य पहावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.यावेळी राहुल इस्लाम, शाहिद बारगीर, एजेस पटेल, महेश चक्रवर्ती,गजानन मोटे आदी उपस्थित होते.