
no images were found
पुणे पोलीस दलात ७९५ जागांवर मेगा भरती प्रक्रीया सुरू
पुणे : पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, राज्य पोलिस दलात मोठ्याप्रमाणात भरती प्रक्रीया सुरू झाली आहे. पुणे विभागासाठी ७९५ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पद – पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक
रिक्त पद संख्या – ७९५
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण
वयाची अट- खुला वर्ग – १८ ते २८ वर्ष
मागास वर्गिय – १८ ते ३३ वर्ष
पुण्यासाठी असलेल्या या जागांसाठी ९ नेव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच करता येणार असून याचं शुल्क खुल्या वर्गासाठी ४५० रुपये असून मागार वर्गासाठी ३५० रुपये आहे.