
no images were found
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आदगोडा पाटील यांचे निधन
जयसिंगपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आदगोडा देवगोंडा पाटील (वय १०८ वर्षे) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक थोर नेत्यांनी आपले प्राण पणाला लावले. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आदगोंडा पाटील यांचाही सहभाग होता.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक क्रांतीकारकांबरोबर प्रत्येक लढ्यात सहभाग घेऊन त्यांनी आपले शौर्य दाखवले होते. स्वातंत्र्यसेनानी पाटील यांनी नुकतीच वयाची १०८ वर्षे पूर्ण केली होती. १ ऑक्टोबर १९१४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे याठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. वयाची १०८ वर्षे पूर्ण केली यानिमित्ताने पार्श्वनाथ दिगंबर जैनमंदिर यांच्या वतीने माजी मंत्री व विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले होते. आदगोंडा पाटील यांनी स्वतःला देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याबरोबर स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले होते. स्वातंत्र्य लढ्यासोबतच सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही आजवर त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. शुक्रवारी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.