Home क्राईम कोल्हापुरात मिरवणूकीने आणलेली २१ लाखांची दुचाकी पहाटे जळाली

कोल्हापुरात मिरवणूकीने आणलेली २१ लाखांची दुचाकी पहाटे जळाली

0 second read
0
0
108

no images were found

कोल्हापुरात मिरवणूकीने आणलेली २१ लाखांची दुचाकी पहाटे जळाली

कोल्हापूर : शहरारील कळंबा येथील एका तरुणाने गेल्या महिन्यात वाजत गाजत आनंदाने ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून आणलेली तब्बल २१ लाख रुपयांची दुचाकी जळून खाक झाली आहे. या दुचाकीच्या शेजारी असलेल्या एका कारचंही आगीत नुकसान झालं आहे. शुक्रवारी (आज) पहाटे ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . हा घातपाटाचा प्रकार असावा अशी चर्चा सुरु आहे.

कळंबा येथील राजेश चौगुले या युवकाने गेल्या महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक किमतीची दुचाकी खरेदी केली. या आनंदाने त्याने दुचाकीची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूकही काढली. त्यामुळे गाडीची चर्चा जिल्हात रंगली. आज पहाटे ही गाडी जळून खाक झाली. सोबत शेजारी असलेली चारचाकी गाडीदेखील जळून खाक झाली आहे, पहाटे साडेतीन वाजता दुचाकीला आग लागल्याचं चौगुल कुटुंबाच्या लक्षात आलं. त्यानंतर सर्वांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्या गाडी शेजारी असलेली त्यांची चारचाकी कारही पूर्णपणे जळाली होती. दरम्यान, या वाहनांना आग कशी लागली? की जाणून बुजून ही आग लावली का ? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत चौगुले यांनी फिर्याद दिली असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विज…