Home सामाजिक पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर उपसाबंदी

पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर उपसाबंदी

1 min read
0
0
38

no images were found

पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर उपसाबंदी

 

कोल्हापूर : पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात रब्बी हंगाम 2023-2024 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले आहेत.

भोगावती नदी – कार्यवाहीचा भाग- राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग व कासारी नदीवरील ठाणे-आळवे को.प.बंधाऱ्याच्या खाली ते शिंगणापूर को.प. बंधाऱ्या पर्यंत दोन्ही तीरावर व कुंभी नदीवरील सांगरुळ को.प. बंधाऱ्याच्या खालील बाजूस कुंभी व भोगावती नदी पर्यंतच्या संगमापर्यंत दोन्ही तीरावर वर नमूद केलेल्या नदीवरील भागात ‍मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात दिनांक 2 ते 3 फेब्रुवारी 2024 या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे.

पंचगंगा नदी – कार्यवाहीचा भाग- पंचगंगा नदीवरील ‍शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याखाली ते  शिरोळ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तिरावरील भाग वर नमूद केलेल्या नदीवरील भागात ‍मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात दिनांक 4 ते 5 फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे.

उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रदद् करण्यात येईल  व होणा-या नुकसानीस पाटबंधारे  खाते जबाबदार राहणार नाही. हा आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कलम 51(3) व 97 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये देण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …