
no images were found
नंगीवली चौक ते कोळेकर तिकटी रस्ता वाहतूकीस 31 दिवस बंद
कोल्हापूर : महापालिकेच्या रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत रस्ता करणेचे काम सुरु करण्यात आले असलेने नंगीवली चौक ते कोळेकर तिकटी हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. या रस्त्याचे काम दि.31 जानेवारी ते 1 मार्च 2024 अखेर करण्यात येणार असल्याने साधारणत: 31 दिवस हे काम सुरू रहाणार आहे. सदरचा रस्ता केएमटी वाहतुकचा मुख्य मार्ग असून परिसरात अनेक शाळा आहेत. तरी या रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक शहर वाहतूक शाखेच्या मार्गदर्शना खाली खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. हि वाहतुक नंगीवली चौक ते टिंबर मार्केट कमान चौक ते लाड चौक ते बिनखांबी मंदीर चौक ते मिरजकर तिकटी या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तरी नागरीकांनी वाहतुकीसाठी या पर्यायी मार्गाचा वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.