no images were found
भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा : चंद्रकांतदादा पाटील
भाजपा नूतन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार संपन्न
कोल्हापूर(प्रतिनिधी ):नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचा सत्कार आज भाजपा जिल्हा कार्यालयात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष अनुक्रमे नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, समरजीतसिंह घाटगे, इचलकरंजी उप-महापौर अनिल डाळ्या, अंबरिष घाटगे, भरमू आण्णा पाटील, सावकार मादनाईक, माधवराव घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. भेटवस्तू देऊन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असल्यानं सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अशी कामगिरी करा. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या ६ जागा किरकोळ मतांनी हातातून निसटल्या आहेत. याबद्दल कोणीही नाराज न होता, पूर्वीच्याच उमेदीनं आणि जोमानं पक्ष कार्यात सक्रीय रहावं. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांची जबाबदारी आता अधिकच वाढलीय. पक्षामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं कार्यरत रहावं. त्यातून जनतेची विकासकामं करुन, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पदाचा वापर करावा, असा सल्ला नामदार पाटील यांनी दिलाय.
याचबरोबर जिल्हा परिषद गटनेता पदी तानाजी पाटील यांच्या नावाची घोषणा नाम.चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.
यावेळी नामदार पाटील आणि खासदार महाडिक यांनी या निवडणुकीतील महायुतीचा सक्सेस रेट सांगितला. या निवडणुकीत महायुतीला १२ लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळालंय. तर महाविकास आघाडीची धाव केवळ साडेतीन लाख मताधिक्यावर थांबलीय.
तर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र या निवडणुकीत दिसून आलंय. त्यामुळं आगामी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक भाजप लढवणार आहे, असं खासदार धनंजय महाडिक यांनी घोषीत केलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन लाख मताधिक्क्यापर्यंत मजल मारलीय, असं सांगत खासदार महाडिक यांनी यापुढंही पक्ष संघटन अधिक बळकट करावं, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय.
याप्रसंगी राहुल चिकोडे, शिवाजी बुवा, मेजर भिकाजी जाधव, डॉ आनंद गुरव, सुशीला पाटील, महेश चौशले यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.