Home Uncategorized एआयच्या युगात पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे काळाची गरज – माध्यम तज्ज्ञ मोहसीन मुल्ला

एआयच्या युगात पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे काळाची गरज – माध्यम तज्ज्ञ मोहसीन मुल्ला

2 second read
0
0
18

no images were found

 

एआयच्या युगात पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे काळाची गरज – माध्यम तज्ज्ञ मोहसीन मुल्ला

कोल्हापूर (प्रतिनिधी):बदलत्या काळात पत्रकारितेचे स्वरूप वेगाने बदलत असून, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) हे पत्रकारांसमोर एक मोठे आव्हान आणि संधी म्हणून समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर युवा पत्रकार संघ, कोल्हापूरच्या वतीने शहाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेली ‘एआय आणि आधुनिक पत्रकारिता’ विषयावरील कार्यशाळा संपन्न झाला. या कार्यशाळेत माध्यम तज्ज्ञ मोहसीन मुल्ला यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून पत्रकारांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या सुरुवातीला युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी प्रमुख वक्ते माध्यम तज्ञ मोहसीन मुल्ला यांचे स्वागत केले. यावेळी शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना मोहसीन मुल्ला यांनी एआय मधील विविध आधुनिक टूल्सची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, “डिजिटल मीडिया, वेब पोर्टल आणि YouTube चॅनेलच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी तंत्रज्ञानासोबत अपडेट राहणे गरजेचे आहे. एआयमुळे कामाचा वेग वाढणार असला, तरी माहितीची सत्यता पडताळणे (Fact-checking) हे पत्रकारांसमोर मोठे आव्हान असणार आहे.” लेखनापासून ते व्हिडिओ एडिटिंगपर्यंत एआयचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी यावेळी सादर केले.
या कार्यशाळेसाठी कोल्हापूर युवा पत्रकार संघाचे सचिव शरद माळी, राज्य सरचिटणीस अजय शिंगे, अनिल पाटील,अमोल पोतदार, दत्तात्रय देवणे, जिल्हाध्यक्ष पंडितराव चौगुले कौतुक नागवेकर, दयानंद जिरगे, संजीव भालेकर, डॉ. युवराज मोरे, रविराज कांबळे यांच्यासह कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी आणि सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणारे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ पत्रकार बाबा खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार युवा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विवेक पोर्लेकर यांनी मानले. या कार्यशाळेमुळे कोल्हापूरच्या पत्रकारितेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत होणार असून, उपस्थित पत्रकारांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…