Home सामाजिक दिवा आणि जीत अदाणी यांनी दिव्यांग महिलांसोबत साजरी केली विवाहाची पहिली वर्षगाठ

दिवा आणि जीत अदाणी यांनी दिव्यांग महिलांसोबत साजरी केली विवाहाची पहिली वर्षगाठ

5 second read
0
0
14

no images were found

दिवा आणि जीत अदाणी यांनी दिव्यांग महिलांसोबत साजरी केली विवाहाची पहिली वर्षगाठ

  • दिवा आणि जीत अदाणी यांनी गेल्या वर्षी, आपल्या विवाहापूर्वी 5 फेब्रुवारी 2025 रोजी दरवर्षी दिव्यांग महिलांना मदत करण्याचा संकल्प केला होता. या उपक्रमाला ‘अदाणी मंगल सेवा’ असे नाव देण्यात आले.
  • या उपक्रमाचा उद्देश दरवर्षी दिव्यांग महिलांसाठी दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे.
  • पहिल्याच वर्षात या उपक्रमाने 500 दिव्यांग महिलांना मदत करण्याची आपली बांधिलकी पूर्ण केली आहे.
  • प्रत्येक लाभार्थी महिलेला 10 लाख रुपयांची मुदतठेव (एफडी) देण्यात आली असून, त्यातून निश्चित मासिक उत्पन्न व दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळते.
  • अदाणी फाउंडेशनद्वारे राबवण्यात येणारा आणि अध्यक्ष श्री गौतम अदाणी यांच्या ‘सेवा ही साधना आहे’ या तत्त्वज्ञानाने प्रेरित हा उपक्रम सन्मान, सातत्य आणि सशक्तीकरण यांवर आधारित आहे.

 

        अहमदाबाद:शांतिग्राम येथील बेल्वेडियर क्लबच्या लॉनवर सेवाभावाचा एक आगळा क्षण साकारला गेला. अदाणी मंगल सेवेच्या एका वर्षाच्या पूर्ततेनिमित्त हा समाधानाचा क्षण अनुभवायला मिळाला.हा प्रसंग दिवा आणि जीत अदाणी यांनी आपल्या विवाहदिनाच्या (7 फेब्रुवारी 2025) आधी घेतलेल्या एका विशेष निर्णयाची आठवण करून देणारा ठरला. वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा क्षण अर्थपूर्ण करणे आणि सेवाभावातून तो साजरा करणे, हा तो निर्णय होता. हा कार्यक्रम केवळ एक स्मरणीय क्षण नव्हता, तर दिलेले शांत वचन पूर्णत्वास नेले गेले आहे, याची साक्ष देणारा होता.

एक वैयक्तिक संकल्प म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आता व्यापक सामाजिक सुरक्षा कार्यक्रमात रूपांतरित झाला आहे. हा कार्यक्रम दरवर्षी 500 दिव्यांग महिलांना सन्मान, स्वातंत्र्य आणि जीवनातील सातत्य प्रदान करतो.अदाणी मंगल सेवेअंतर्गत 25 ते 40 वयोगटातील दिव्यांग महिलांना सहाय्य दिले जाते. युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी (UDID) कार्ड असलेल्या लाभार्थी महिलांची निवड यूथ फॉर जॉब्स प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांच्या सहकार्याने प्रत्येक लाभार्थी महिलेला 10 लाख रुपयांची मुदतठेव (एफडी) दिली जाते. या माध्यमातून निश्चित मासिक उत्पन्न मिळते आणि 10 वर्षांनंतर मूळ रक्कम लाभार्थीला प्राप्त होते. एकरकमी मदतीऐवजी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेचा हा उपक्रम आहे.

या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 500 दिव्यांग महिलांना सहाय्य देण्याचा संकल्प असून, त्यासाठी दरवर्षी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मंगल सेवा हा अदाणी समूहाचे संस्थापक व अध्यक्ष श्री गौतम अदाणी यांच्या ‘सेवा ही साधना आहे’ या मूलमंत्राला पुढे नेणारा उपक्रम आहे. सेवा ही सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि जबाबदारीने केली गेली पाहिजे, केवळ प्रतीकात्मक नसावी, या विचारातून या उपक्रमाला आकार मिळाला आहे. त्यामुळे हा एक कौटुंबिक प्रयत्न न राहता शाश्वत सामाजिक बांधिलकीत रूपांतरित झाला आहे.

संध्याकाळचा कार्यक्रम अत्यंत सौम्य व आपुलकीच्या वातावरणात पार पडला. लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय समूहाने उपस्थित राहिले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व चिंतनाने झाली. त्यानंतर सादरीकरणातून अदाणी मंगल सेवेचे मूलतत्त्व अधोरेखित करण्यात आले—समृद्धीचा खरा अर्थ तेव्हाच असतो, जेव्हा ती इतरांसाठीही शाश्वत संधी निर्माण करते.संध्याकाळचा सर्वात भावनिक क्षण तो होता, जेव्हा लाभार्थी महिलांना एफडी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्रे स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि सुरक्षिततेचा भाव स्पष्ट दिसत होता. अहमदाबाद नेत्रहीन संघाच्या गरबा व फ्युजन संगीतासारख्या सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमात रंगत आणली.

 

या प्रसंगी आनंद व्यक्त करताना गौतम अदाणी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले –“जीत आणि दिवा त्यांच्या वैवाहिक जीवनाचा एक वर्षाचा टप्पा पूर्ण करत आहेत. या आनंदाच्या प्रसंगी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.याच दिवशी गेल्या वर्षी त्यांनी ‘मंगल सेवा’चा संकल्प केला होता, ज्यानुसार दरवर्षी 500 नवविवाहित दिव्यांग भगिनींना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा प्रण केला गेला, जो आजही त्याच समर्पणाने सुरू आहे. हे माझ्यासाठी अत्यंत समाधान आणि कृतज्ञतेचे आहे.या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या आयुष्यात सन्मान आणि नव्या आशेसह नव्या सुरुवातीची संधी मिळाली आहे. एखाद्या मुलीच्या आयुष्यात पुन्हा हास्य आणि आत्मविश्वास परतताना पाहण्याचा जो आनंद आहे, त्यापुढे जगातील मोठमोठ्या उपलब्धीही लहान वाटतात.एक पिता म्हणून मला अभिमान वाटतो की माझी मुले आपल्या आनंदासोबत अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आशा आणि स्मितहास्य पेरण्याचा प्रयत्न करत आहेत.देवाकडे माझी हीच प्रार्थना आहे की सेवेची ही भावना पुढेही अनेक कुटुंबांच्या आयुष्यात सुख, सन्मान आणि नवी आशा घेऊन येवो, आणि जीत व दिवा या मार्गावर अखंड पुढे जात राहोत.”

लाभार्थी व उपस्थितांना संबोधित करताना अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी म्हणाल्या,“आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे. आपण येथे केवळ एका कार्यक्रमासाठी नाही, तर मानवी सन्मान, आशा, स्वप्ने आणि सशक्तीकरण यांचा सन्मान करण्यासाठी एकत्र आलो आहोत. अदाणी मंगल सेवेची प्रेरणा एका साध्या पण गहन विचारातून जन्माला आली आहे—वैयक्तिक आनंदाचा सर्वोच्च अर्थ तो समाजकल्याणासाठी वाटला गेला, तेव्हाच मिळतो.

जीवन आपल्याला आनंदाचे क्षण देते, तेव्हा तो आनंद समाजासोबत वाटणे हीच खरी सेवा आहे. म्हणूनच अदाणी मंगल सेवा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हा केवळ एक कार्यक्रम नाही; ही एक भावना आहे, एक विश्वास आहे—की प्रत्येक महिलेमध्ये अपार शक्ती असते. दिव्यांगत्व ही अडचण नसून, जीवनाकडे धैर्य, लवचिकता आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता आहे. येथे उपस्थित प्रत्येक भगिनी ही त्या शक्तीचे जिवंत उदाहरण आहे.”

यावेळी बोलताना जीत अदाणी म्हणाले,“मंगल सेवेने आम्हाला शिकवले आहे की कधी कधी सर्वात मोठा आधार तो असतो, जो शांतपणे, सातत्याने, विश्वासार्ह आणि सन्मानपूर्वक मिळत राहतो. आमच्यासाठी हा एकदाच पूर्ण होणारा उपक्रम नाही, तर ही एक जबाबदारी आहे, जी आम्ही सतत निभावत राहू.”दिवा अदाणी म्हणाल्या,“अदाणी मंगल सेवा एका विश्वासावर उभी आहे—की सुरक्षा ही शाश्वत असली पाहिजे आणि सन्मान कधीही परिस्थितींवर अवलंबून नसावा.”

कार्यक्रमादरम्यान श्री गौतम अदाणी यांच्या हस्ते अदाणी मंगल सेवेच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात संघर्षातून यशाकडे नेणाऱ्या परिवर्तनाच्या कथा संकलित करण्यात आल्या आहेत. सामूहिक स्नेहभोजनाने संध्याकाळचा समारोप झाला.अदाणी मंगल सेवेने आपले पहिले वर्ष पूर्ण केले असून, उद्देशाला संधीपेक्षा अधिक महत्त्व दिल्यास त्याचा प्रभाव किती व्यापक असू शकतो, हे सिद्ध केले आहे. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातील सेवा कार्यांपासून ते गेल्या वर्षी पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान यात्रेकरूंना दिलेल्या सहकार्यापर्यंत, मूलमंत्र एकच राहिला आहे—खरी समृद्धी सेवेतीलच आहे, आणि सन्मान, उद्देश व सातत्याने केली गेलेली सेवा हीच खऱ्या अर्थाने भक्ती ठरते. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…