Home सामाजिक रंगकर्मी, कलाकार, कलाप्रेमीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्री.राजेश क्षीरसागर यांचे आभार

रंगकर्मी, कलाकार, कलाप्रेमीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्री.राजेश क्षीरसागर यांचे आभार

0 second read
0
0
16

no images were found

रंगकर्मी, कलाकार, कलाप्रेमीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्री.राजेश क्षीरसागर यांचे आभार

कोल्हापूर  : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरच्या कला क्षेत्राचे नुकसान झाले. नाट्यगृहाची वास्तू जशीच्या तशी उभी रहावी अशी रंगकर्मी, कलाकार, कलाप्रेमीची तसेच संपूर्ण कोल्हापूर वासीयांची मागणी आहे. दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याठिकाणी भेट देण्याची विनंती श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महत्त्वाचे दौरे आटपून दुसऱ्याच दिवशी घटनास्थळी भेट देवून रंगकर्मी व कलाकारांना दिलासा दिला. नाट्यगृह पुढील काळात दिमाखात उभे करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नगरविकास विभागाकडून “कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग मैदानाचे नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे.” या कामांकरिता रु.२५ कोटीची निधी मंजूर शासन आदेशाद्वारे दिली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे रंगकर्मी, कलाकार, कलाप्रेमी व समस्त कोल्हापूरवासीयांची वचनपूर्ती करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यासाठी विशेष प्रयत्न करणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे जाहीर आभार मानत असल्याची भावना रंगकर्मी प्रसाद जमदग्नी व्यक्त केल्या.
राज्य सरकारने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी रु.२५ कोटी निधी मंजूर केल्याबदल रंगकर्मी, कलाकार, कलाप्रेमी आणि शिवसैनिकांच्यावतीने आनंदोत्सव नाट्यगृह परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व आहे. जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात त्यांची कोणीही बरोबरी करू शकत नाही. केशवराव भोसले नाट्यगृह आपली अस्मिता असून, तिची पुनर्बांधणी व संवर्धन करण्याची जबाबदारी शिवसेनेने उचलली असून, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर विशेष पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समर्थ साथ लाभली असून, हे नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभारून रंगकर्मी, कलाकार व कलाप्रेमीसाठी खुले करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार सक्षम आहे.
यानंतर बोलताना प्रसाद जमदग्नी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रंगकर्मी, कलाकारांच्या भावना तत्परतेने जाणून घेतल्या. कोल्हापूरच्या या अस्मितेबाबत शासनाने जलदगतीने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. यामध्ये राजेश क्षीरसागर यांनी अग्रक्रमाने पाठपुरावा करून निधी मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनानेही कार्यतत्परता दाखवली असल्याने लवकरच मंजूर निधीतून कामास सुरवात होवून संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त नाट्यगृह मूळ स्वरूपात उभे राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी रंगकर्मी राष्ट्रीय पुरस्कार विजेते सागर बगाडे यांनी, निधी मंजुरीबाबत आभार मानत या घटनेत ज्या व्यावसायिकांच्या साहित्याचे नुकसान झाले होते त्यांना तात्काळ रु.५ लाखांची मदत करून त्यांना दिलासा दिल्याबद्दल राजेश क्षीरसागर यांचे विशेष आभार मानले.
यावेळी रंगकर्मी राष्ट्रीय पुरस्कार विजेते सागर बगाडे, प्रसाद जमदग्नी, सुनिल घोरपडे, रोहन घोरपडे, किरणसिंह चव्हाण, सागर वासुदेवन, शिवाजी पाटील, सुनिल मुसळे, शिवसेनेचे रमेश खाडे, किशोर घाटगे, सुनील जाधव, रणजीत मंडलिक, अंकुश निपाणीकर, पूजा भोर, अमरजा पाटील, पूजा कामते, पूजा आरदांडे, सचिन पाटील, किरण पाटील, श्रीकांत मंडलिक, रियाज बागवान, कपिल नाळे, प्रशांत साळुंखे, अमित चव्हाण, शेखर जाधव, किरण अतिग्रे, अविनाश कामते यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, इतर रंगकर्मी, कलाकार व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…