
no images were found
११ भाषांमध्ये रिलीज होणार विवेक अग्निहोत्रींचा नवा चित्रपट
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट खूप गाजला होता. पुढील चित्रपटाचे नाव ‘द व्हॅक्सिन वॉर’ असल्याचे विवेक अग्निहोत्रींनी स्पष्ट केले.
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘द व्हॅक्सिन वॉर’.
लसीची एक बॉटल असलेले असे हे पोस्टर आहे. त्या बॉटलवर ‘द व्हॅक्सिन वॉर’ लिहिलेले आहे. एकंदरीत ही कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले. या ११ भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून त्याआधी मात्र त्यांना कलाकारांचा विचार करावा लागणार आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे, “एक अशी लढाई जी तुम्ही लढली होती, परंतु तुम्हाला त्याबद्दल माहिती नाही. आणि तीच लढाई तुम्ही जिंकली आहे.”
या चित्रपटाची निर्मिती विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी पल्लवी जोशी करणार आहेत. ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपट वर्षातील पहिला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. आता प्रेक्षकांना ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाबद्दल उत्सुकता असेल.