Home उद्योग डिस्कॉम्समध्ये अदाणी एनर्जी सोल्यूशन्स ने गाठला 1 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याचा ऐतिहासिक टप्पा

डिस्कॉम्समध्ये अदाणी एनर्जी सोल्यूशन्स ने गाठला 1 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याचा ऐतिहासिक टप्पा

14 second read
0
0
28

no images were found

डिस्कॉम्समध्ये अदाणी एनर्जी सोल्यूशन्स ने गाठला 1 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याचा ऐतिहासिक टप्पा

अहमदाबाद, : भारतातील अग्रगण्य एकात्मिक ऊर्जा समाधान कंपनी अदाणी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड (एईएसएल) ने देशभरातील वीज वितरण कंपन्यांमध्ये (डिस्कॉम्स) यशस्वीरित्या 1 कोटी स्मार्ट वीज मीटर बसवून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतात आणि कदाचित जागतिक स्तरावरही अशी कामगिरी करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. पुढील आर्थिक वर्षात आणखी 1 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडर (एएमआयएसपी) म्हणून एईएसएल ला पाच राज्यांमध्ये सुमारे 2.5 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दररोज सुमारे 25,000 मीटर बसवण्याचा वेग हा उद्योगातील सर्वाधिक मानला जात आहे.

         कंपनीने 31 मार्च 2026 पर्यंत 1 कोटी मीटर बसवण्याचे लक्ष्य जाहीर केले होते; मात्र हा टप्पा त्यापूर्वीच पूर्ण झाला आहे. किरकोळ वीज वितरण क्षेत्रात डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याच्या एईएसएल च्या बांधिलकीचे हे प्रतीक आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अचूक माहिती उपलब्ध होत असून ग्रीडचे आधुनिकीकरण आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारक बनते.तसेच,भारत सरकारच्या ‘रिवॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम’ (आरडीएसएस) अंतर्गत सुरू असलेल्या देशव्यापी स्मार्ट मीटरिंग मोहिमेलाही यामुळे गती मिळत आहे.एईएसएल चे स्मार्ट मीटर नेटवर्क ग्राहकांना रिअल-टाइम वापराची माहिती देते, बिलिंगमध्ये पारदर्शकता वाढवते आणि वीज वितरण कंपन्यांच्या कामकाजाची कार्यक्षमता सुधारते.

       अदाणी एनर्जी सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल म्हणाले, “1 कोटी स्मार्ट मीटरची स्थापना हा आमच्या उत्कृष्ट अंमलबजावणी क्षमतेचा आणि वितरण कंपन्या तसेच ग्राहकांशी असलेल्या दृढ सहकार्याचा परिणाम आहे. हे स्मार्ट मीटर केवळ उपकरणे नसून ग्राहकांना त्यांच्या वीज वापराबाबत तत्काळ माहिती देणारे, ग्रीड अधिक विश्वासार्ह बनवणारे, तोटा कमी करणारे आणि ऊर्जा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करणारे महत्त्वाचे साधन आहेत. भारताच्या डिजिटल ऊर्जा परिवर्तनात आम्ही सक्रिय भूमिका बजावत राहू.”

      उच्च स्थापना दर साध्य करण्यासाठी एईएसएल ने एकात्मिक आणि समन्वयित पद्धत अवलंबली आहे. संपूर्ण मूल्यसाखळीवर नियंत्रण आणि पारदर्शकता राखण्यासाठी कंपनीने अदाणी इस्यासॉफ्ट स्मार्ट सोल्यूशन्सच्या स्मार्ट मीटरिंग व आयओटी विभागासोबत तसेच स्थानिक डेटा होस्टिंगसाठी अदाणी कनेक्‍ससोबत भागीदारी केली आहे. याशिवाय, वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आघाडीच्या मीटर उत्पादक कंपन्यांशी करार केले आहेत. समूहाच्या सीएसआर उपक्रमांतर्गत तंत्रज्ञांना प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तयार केले जात आहे. या सर्व प्रयत्नांमुळे एईएसएल ची अंमलबजावणी क्षमता अधिक बळकट झाली आहे. एईएसएल ने 2024 मध्ये स्मार्ट मीटरिंग उपक्रम सुरू केला आणि अवघ्या सुमारे 24 महिन्यांत हा टप्पा गाठत देशातील सर्वात वेगवान स्थापना दर नोंदवला आहे.

       आरडीएसएस योजनेअंतर्गत भारतात वीज वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुमारे 25 कोटी पारंपरिक मीटरच्या जागी प्रगत स्मार्ट मीटर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्मार्ट मीटरमुळे बिलिंगची अचूकता वाढते, मागणीचे नियोजन सुधारते, तांत्रिक व व्यावसायिक (एटी अँड सी) तोटा कमी होतो, नूतनीकरणीय ऊर्जा स्रोतांचे समाकलन सुलभ होते आणि ग्रीड नियोजन व संचालन अधिक परिणामकारक बनते. तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…