Home शासकीय मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त निवडणूक विभागातील 2 हजार 975 अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त निवडणूक विभागातील 2 हजार 975 अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

30 second read
0
0
20

no images were found

मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त निवडणूक विभागातील हजार 975 अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

कोल्हापूर, (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी उद्या शहरातील 595 मतदान केंद्रात निवडणूक होत आहे. यासाठी शहरातील 595 मतदान केंद्रांची तयार करण्यात आली आहे. या मतदानासाठी  नियुक्त 2 हजार 975 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी मतदानाशी संबंधित अंतिम प्रशिक्षण झाले. यावेळी सर्व मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यानंतर सर्व पथके मतदान केंद्राकडे रवाना झाली. सकाळी महासैनिक प्रशिक्षण केंद्र, व्ही.टी.पाटील सभागृह, दुधाळी गांधी मैदान, व हॉकी स्टेडीयम या ठिकाणाहून निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व साहित्य वाटपाच्या कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दुपारी साहित्य वाटपाच्या ठिकाणी भेटी दिल्या. या ठिकाणी करण्यात आलेल्या स्ट्राँग रुमची पाहणीही त्यांनी केली.

            मतदान केंद्रांवरील विविध प्रकारच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी 2 हजार 975 अधिकारी व कर्मचारी 595 मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतदान प्रक्रियेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी, होमगार्ड, कर्मचारी यांचीही नियुक्त करण्यात आलेली आहे.

            सकाळी फिरतीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील, उप-आयुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…