no images were found
पॅरोलवर सुटलेलेल्या तरुणाचे शीर केले धडावेगळे
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये दोन गटातील जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून शीर धडावेगळे करण्यात आले. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर निवासी परिसरात ही घटना घडली. दुर्गापूर मुख्य मार्गावर हे हत्याकांड घडले. महेश मेश्राम (वय ३५ ) असं मृत तरुणाचे नाव आहे. महेशवर ३ ते ४ जणांनी प्राणघातक हल्ला केला.
आरोपीनी आधी महेश मेश्राम याला बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचं शीर धडावेगळे केलं. महेश मेश्राम याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तर शीर काही अंतरावर पडलेले होते.
मृतक महेश मेश्राम याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपी आणि मृतकाचा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी संशयाच्या आधारे सध्या 2 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.