Home सामाजिक मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाविरोधात नेसरीत आंदोलन

मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाविरोधात नेसरीत आंदोलन

0 second read
0
0
177

no images were found

मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाविरोधात नेसरीत आंदोलन

कोल्हापूर : जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावातील नागरिकांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाविरोधात जोरदार आंदोलन केलं आहे.
स्वराज्य या संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत चित्रपटांतून शिवकालीन इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप केला. चुकीचा इतिहास दाखवल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही यावेळी संभाजीराजेंनी दिला होता. त्यानंतर आता
प्रतापराव गुजर आणि बहलोल खान यांच्यातील युद्ध नेसरी या गावात झाले होते. मात्र ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याचा दावा करत नेसरी गावातील नागरिकांनी मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला. काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर स्वराज्य या संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत चित्रपटांतून शिवकालीन इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप केला. चुकीचा इतिहास दाखवल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही यावेळी संभाजीराजेंनी दिला होता. त्यानंतर आता यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. मात्र या चित्रपटात योद्धांची नावे बदलण्यात आल्याचा दावा काही इतिहासकारांनी केला आहे. इतिहासकारांच्या या दाव्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. त्यानंतर आता नेसरी गावातील नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, दिग्दर्शकांनी आमच्या गावात यावं आणि खरा इतिहास समजून घेऊन मगच असे चित्रपट बनवावेत, अशी भूमिका आंदोलनकर्त्या गावकऱ्यांनी मांडली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…