no images were found
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ऑपरेशनल लाँचपूर्वी आकाशात 1515 ड्रोनचा भव्य शो आयोजित
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला, विमानतळाच्या ऑपरेशनल लाँचिंगच्या निमित्ताने 1515 ड्रोनचा भव्य आणि नेत्रदीपक ड्रोन शो आयोजित करण्यात आला. या शोमध्ये ड्रोननी उत्तम समन्वय साधत आकाशात आकर्षक आकृती साकारल्या. यामध्ये 3डी कमळ, लोटस डिझाइन इंटिरिअर्स, विमानतळाचा लोगो, ग्रीन एअरपोर्ट, मुंबईवरून उडणारे विमान, ‘राइज ऑफ इंडिया’ विविध आकृती दाखवण्यात आल्या. या आकृतींमधून विमानतळाची संकल्पना आणि भव्यता दिसून आली. या कार्यक्रमात नवकल्पना आणि कलेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. रात्रीचे आकाश जणू एक कॅनव्हास बनले आणि त्यावर अविस्मरणीय आणि लक्षवेधी आकर्षक दृश्ये साकारली गेली.
या कार्यक्रमाला विशेषतः दिव्यांग व्यक्ती, तरुण खेळाडू तसेच एनएमआयएचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी हा खास क्षण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांसमोर अनुभवला.