no images were found
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कमर्शियल उड्डाणांची सुरुवात
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने 25 डिसेंबर 2025 रोजी पहिल्या कमर्शियल विमानाच्या आगमनासह आपल्या कामकाजाची सुरुवात केली. विमानतळावर विमानाचे आगमन होताच त्याला पारंपरिक वॉटर कॅनन(जल तोफेने) सलामी देण्यात आली. ही विमानसेवेतली जुनी परंपरा असून एनएमआयए वरील पहिल्या कमर्शियल लँडिंग आणि टेक-ऑफ चे प्रतीक आहे.
बंगळुरूहून आलेल्या इंडिगोच्या 6E460 या पहिल्या विमानाचे सकाळी 8.00 वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले आणि त्याचे पारंपरिक जल तोफेने स्वागत करण्यात आले. त्यानंतर विमानतळावरून पहिली इंडिगो फ्लाइट 6E882 हैदराबादसाठी सकाळी 08:40 वाजता रवाना झाली, ज्यामुळे एनएमआयएवरील पहिल्या लँडिंग आणि टेक-ऑफ चा टप्पा पूर्ण झाला.
एनएमआयएवर नियोजित प्रवासी विमानसेवेची सुरुवात ही भारताच्या नागरी विमानवाहतूक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून मुंबई महानगर क्षेत्रासाठी (एमएमआर) हवाई प्रवासाची क्षमता वाढवणारी ठरणार आहे.