Home मनोरंजन वचन दिले तू मला मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले साकारणार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार

वचन दिले तू मला मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले साकारणार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार

4 second read
0
0
41

no images were found

वचन दिले तू मला मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले साकारणार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार

नाटक असो, सिनेमा असो, मालिका असो किंवा वेबसीरिज. या चारही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे वैभव मांगले. विविधरंगी भूमिकांमध्ये त्यांना आतापर्यंत आपण पहात आलोय. स्टार प्रवाहच्या वचन दिले तू मला मालिकेत ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या भूमिकेत दिसणार आहेत. वैभव मांगले मुळचे कोकणातले त्यामुळे कोकणी, मालवणी आणि वऱ्हाडी या तिन्ही बोलीभाषा अगदी सफाईने बोलतात. जगन्नाथ गुडपल्लीवार हे पात्र बेळगावी असल्यामुळे या पात्राच्या निमित्ताने बेळगावी भाषेचा गोडवाही ते अनुभवणार आहेत.

      वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या पात्राविषयी सांगताना वैभव मांगले म्हणाले, ‘अतिशय वेगळं पात्र आहे. खूप इमानदार आहे असं त्याच्याबद्दल बोलता येणार नाही. पण जेव्हा खरोखर अन्याय होतो तेव्हा पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यायची त्याची तयारी असते. गुन्हेगारांकडून गुन्हा कबूल करून घेणं ही त्याची विशेष हातोटी. तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि सिस्टीम कोळून प्यायलेला जगन्नाथ गुडपल्लीवार साकारताना खरंच वेगळा अनुभव मिळत आहे. प्रेक्षकांना हे पात्र आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका वचन दिले तू मला रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…