no images were found
पुण्यातील नेत्रशल्यचिकित्सक डॉ.जीवन लाडी यांनी विकसित केलेल्या व्हीओझेड आणि सेफ तंत्रामुळे लेसर प्रक्रियांमध्ये परिवर्तन
पुणे : पुणे स्थित नेत्रशल्यचिकित्सक डॉ.जीवन लाडी यांनी विकसित केलेल्या कमीत कमी छेद असलेल्या तंत्रांच्या वापरामुळे चष्मा घालविण्यासाठी प्रक्रियांमध्ये परिवर्तन घडत आहे.
नुकत्याच केलेल्या एका प्रक्रियाबाबत सांगताना दादा आय लेसर इन्स्टिट्युटचे संस्थापक डॉ.जीवन लाडी म्हणाले की, सुदान मधील 30 वर्षीय पुरूष रूग्ण आमच्या क्लिनिकमध्ये आला होता. हा तरूण थोडा निराश झाला होता,कारण त्याचा कॉर्निआ पातळ असल्याने भारताबाहेरील इतर डॉक्टरांनी त्याला चष्मा घालविण्यासाठी लेसर प्रक्रिया करू नको असे सांगितले.त्याचा दीर्घदृष्टीसाठी (मायोपिया) उजव्या डोळ्यासाठी नंबर -7 आणि डावीकडच्या डोळ्याचा नंबर -6 असा होता.
डॉ.लाडी म्हणाले की,पातळ असलेल्या कॉर्निआमध्ये आव्हान हे असते की,अपवर्तन त्रुटी (रिफ्रॅक्टीव्ह एरर्स) घालविण्यासाठी पुरेशा प्रमाणात उती नसतात.मात्र,व्हेरिएबल ऑप्टिक झोन (व्हीओझेड) मध्ये बाहुलीच्या आकारानुसार किमान उतीचा वापर केला जातो.आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकाशाच्या परिस्थितींवर बाहुलीचा आकार मोजला जातो.या माहितीचा वापर लेसरने उपचार करताना कॉर्निआमध्ये किती प्रमाणात उती गरजेच्या आहेत,हे ठरविण्यासाठी केला जातो. बाहुलीच्या आकारानुसार हे मोजमाप करण्यासाठी एक विशेष सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.या अभिनव तंत्रामुळे प्रत्येक व्यक्तीच्या गरजांनुसार अशा लेसर पध्दतींमध्ये परिवर्तन घडले आहे. हे तंत्र चष्मा घालवू इच्छिणाऱ्या 18 ते 60 वयोगटातील लोकांवर केल्या जाणाऱ्या लेसर प्रक्रियांसाठी योग्य आहे.
सुदान मधून आलेल्या या रूग्णावर प्रक्रिया करण्यात आली.नैसर्गिक दृष्टी लगेचच प्राप्त झाल्याने रूग्ण आनंदित होता.त्यानंतर तो आपल्या मायदेशी परतला.
सेफ (एसएएफई – शिअरींग अप्लायड फोर्स एक्स्ट्रॅक्शन) हे डॉ.लाडी यांनी आणखी एक विकसित केलेले परिवर्तनकारक तंत्र आहे.स्मॉल इनसिजन लेंटीक्युईल एक्स्ट्रॅक्शन (स्माईल) सारख्या आधुनिक लॅसिक लेसर्समध्ये वापरण्यात येणारे हे तंत्र कॉर्नियाला कमीत कमी दाह होऊन लवकर बरे होण्यास मदत करते.या पध्दतीमध्ये ब्लेडस किंवा फ्लॅप्सची गरज नाहिशी होते आणि यामुळे वेदनाविरहित आणि कमी होण्याचे शक्य होते.रूग्ण या प्रक्रियेनंतर लगेचच आपल्या दैनंदिन कार्याला सुरूवात करू शकतात.
व्हीओझेड ही प्रक्रिया 30 टक्क्याहून अधिक उती वाचविते,तर सेफमुळे नैसर्गिक दृष्टी जलदरित्या प्राप्त होऊ शकते.दोन्ही तंत्रे हे डॉ.लाडी यांनी 2022 आणि 2023 दरम्यान विकसित केले असून अनेक रूग्णांना त्याचा फायदा झाला आहे.यासंदर्भात डॉ.लाडी यांनी लिहिलेले शोधनिबंध अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिध्द झाले आहे.
विशेष बाब म्हणजे पुण्यातील काही नेत्रतंज्ञांनवरही या प्रक्रिया झाल्या आहेत.पुण्यातील नेत्रशल्यचिकित्सक डॉ.मानसी गोडबोले – घारपुरे म्हणाल्या की, मी लहानपणापासूनच निकट दृष्टीदोषासाठी चष्मा वापरत होते.ज्याला मायोपिया असेही म्हणतात.मला नेहमीच माझा चष्मा घालवायचा होता.मी स्वत: डॉ.जीवन लाडी यांच्याकडून अभिनव लेसर उपचार करून घेतले आणि माझे दैनंदिन कामकाज लगेचच सुरू केले.फक्त भारतीय लोकसंख्येसाठी नव्हे तर जगभरातील कॉनिआ पातळ असलेल्या लोकांना व्हीओझेड आणि सेफ या पध्दतींचा फायदा होऊ शकेल.माझ्या स्वत:च्या लेसर शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चार दिवसांतच रूग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार सुरू केले.
लाडी मेथडमुळे वाढली मोतीबिंदू शस्त्रक्रियेची अचूकता
डॉ.जीवन लाडी यांनी विकसित केलेले लाडी मेथड हे लेन्सची पॉवर शोधण्यासाठी किफायतशीर तंत्र म्हणून काम करते व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सामान्य लोकांच्या आवाक्यात ठेवण्यास मदत करते.या पध्दतीला 2023 मध्ये भारतीय कॉपीराईट प्राप्त झाले असून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणाऱ्या हजारो रूग्णांना त्याचा फायदा होत आहे.
डॉ.जीवन लाडी म्हणाले की, मोतीबिंदू हे भारतातील अंध्यत्वाचे प्रमुख कारण आहे.शस्त्रक्रियेनंतर चष्म्यापासून मुक्त होण्यासाठी डोळ्याच्या आत एक कृत्रिम लेन्स बसविली जाते.लाडी पध्दतीने लेन्सची पॉवर शोधण्यासाठी अल्ट्रा साऊंडचा वापर केला जातो. इतर पध्दतींच्या तुलनेत यात उत्कृष्ट परिणाम प्राप्त होतात आणि तुलनेने किफायतशीर असल्याने सामान्य लोकांच्या आवाक्यात राहते.
डॉ. लाडी पुढे म्हणाले की, मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान डोळ्यातील नैसर्गिक लेन्स काढून टाकली जाते व त्याजागी आयओएल (इन्ट्रा ऑक्युलर) लेन्स ही कृत्रिम लेन्स बसविली जाते.या सर्व प्रक्रियेत मोतीबिंदू शस्त्रक्रियेपूर्वीचा हा एक महत्त्वाचा भाग असतो.,ज्याचा शस्त्रक्रियेच्या परिणामांमध्ये महत्त्वाचा वाटा असतो. वापरायचे लेन्स निश्चित करण्यासाठी एक सुत्राद्वारे मोजमाप केले जातात. अचूक मोजमाप झाल्यामुळे शस्त्रक्रियेपश्चात चष्म्यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. ही पध्दती तुलनेने स्वस्त व अचूक असल्याने सर्वांना याचा फायदा होऊ शकतो.याला ऑगस्ट 2023 मध्ये कॉपीराईट प्राप्त झाले आहे. या पध्दतीचा आणखी एक फायदा म्हणजे लेसर,रोबोटिक,फॅको आणि हाताने केलेल्या शस्त्रक्रियांसारख्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये या तंत्राचा वापर होऊ शकतो.
नेत्ररोग तज्ञ प्रा.डॉ.रंजना पांडे म्हणाल्या की,मला या तंत्रज्ञानामध्ये विश्वास असल्याने माझ्या स्वत:वर डॉ.जीवन लाडी यांच्या लाडी मेथडने मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली आहे.मला चष्म्यातून मुक्तता मिळाली असून मी माझे दैनंदिन कामकाज चष्म्याशिवाय सुरू ठेवले आहे.अल्ट्रासाऊंडवर आधारित ही पध्दती किफायतशीर असून फक्त भारतासारख्या विकसनशील देशांनाच नव्हे तर जगभरातील सर्व घटकांना याची मदत होऊ शकेल.