Home आरोग्य राज्यपालांच्या पुढाकाराने मंगळवारपासून ‘टीबीमुक्‍त मुंबई’ अभियान

राज्यपालांच्या पुढाकाराने मंगळवारपासून ‘टीबीमुक्‍त मुंबई’ अभियान

30 second read
0
0
6

no images were found

राज्यपालांच्या पुढाकाराने मंगळवारपासून ‘टीबीमुक्‍त मुंबई’ अभियान

·         महापौर, उपमहापौर, आयुक्त यांच्या उपस्थितीत मंगळवारी धारावी व सायन येथे अभियानाचा शुभारंभ
·         राज्‍यपालांच्‍या हस्‍ते क्षयरुग्‍णांना पोषण आहार किटचे वाटप केले जाणार

मुंबई, : महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता (दि. २६ मे) धारावी व सायन येथे होणार आहे.

    मुंबईच्‍या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत धारावी येथील एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्‍य केंद्र येथे तसेच ११.३० वाजता सायन येथील लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्‍णालय येथे अभियानाची सुरुवात करण्‍यात येणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्‍ते क्षयरूग्‍णांना पोषण आहार किटचे वाटप देखील करण्‍यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

डी. वाय. पाटील साळोखेनगरच्या विद्यार्थ्याची स्नेइडर इलेक्ट्रिकमध्ये निवड -यश मिळवणारा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी

डी. वाय. पाटील साळोखेनगरच्या विद्यार्थ्याची स्नेइडर इलेक्ट्रिकमध्ये निवड -यश मिळवणारा पश्च…