Home निवड डी. वाय. पाटील साळोखेनगरच्या विद्यार्थ्याची स्नेइडर इलेक्ट्रिकमध्ये निवड -यश मिळवणारा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी

डी. वाय. पाटील साळोखेनगरच्या विद्यार्थ्याची स्नेइडर इलेक्ट्रिकमध्ये निवड -यश मिळवणारा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी

2 second read
0
0
11

no images were found

डी. वाय. पाटील साळोखेनगरच्या विद्यार्थ्याची स्नेइडर इलेक्ट्रिकमध्ये निवड -यश मिळवणारा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी

साळोखेनगर (प्रतिनिधी) : येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षात शिकणारा ओंकार चोडणकर या विद्यार्थ्यांची स्नेइडर इलेक्ट्रिक बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड*झाली आहे.

कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हद्वारे ही निवड झाली आहे.या प्रक्रियेमध्ये देशभरातील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३ राज्यांमधून केवळ १२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्रमधून निवड होणारा ओंकार हा एकमेव विद्यार्थी आहे. त्याला 5 लाख 50 हजार रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

निवड प्रक्रियेमध्ये ग्रुप डिस्कशन, टेक्निकल राउंड, मॅनेजेरियल राउंड आणि एचआर राउंड अशा चार टप्प्यांचा समावेश होता. उत्कृष्ट तांत्रिक ज्ञान, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर ओंकारने हे यश संपादन केले.

महाविद्यालयाचे कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या प्लेसमेंटवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माने म्हणाले, नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये प्रात्याक्षिकावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते याचा उपयोग विद्यार्थ्यांची निवड होण्यास उपयुक्त ठरते.

कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, विभागप्रमुख डॉ. विद्या अब्दुलपूरकर, टीपीओ प्रिती भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

ओंकारच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील आणि देवश्री पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

राज्यपालांच्या पुढाकाराने मंगळवारपासून ‘टीबीमुक्‍त मुंबई’ अभियान

राज्यपालांच्या पुढाकाराने मंगळवारपासून ‘टीबीमुक्‍त मुंबई’ अभियान · &nbs…