Home Uncategorized वर्कशॉप विभागाची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्याकडून पाहणी

वर्कशॉप विभागाची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्याकडून पाहणी

15 second read
0
0
9

no images were found

वर्कशॉप विभागाची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर,  : महापालिकेच्या वर्कशॉप विभागाची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी आज सायंकाळी पाहणी केली. यावेळी वर्कशॉपमधील जुना स्क्रॅप तातडीने काढून त्याचा लिलाव करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सहायक आयुक्त विजय पाटीलवर्कशॉप प्रमुख संजय भोसलेअभय तेंडुलकरराजू पागरमहेश महाडीक व सुधीर राणे उपस्थित होते.

       स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी वर्कशॉपची संपूर्ण पाहणी करून विविध विभागातील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच वर्कशॉपमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. प्रत्येक विभागीय कार्यालयासाठी स्वतंत्र टँकरजेसीबीडंपर व रोलर उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. त्यामुळे प्रभागातील विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.

       तसेच १५ वर्षांची मुदत पूर्ण झालेल्या २७ वाहनांचा शासनाच्या अधिकृत कंपनीमार्फत लिलाव करावा. महापालिकेतील सर्व विभागांमधील स्क्रॅप काढण्याचे नियोजन करूनया प्रक्रियेतून महापालिकेला मिळणारे उत्पन्नातून  नविन वाहने व व्हाट्सअप ला आवश्यक ते साहित्य खरेदी करण्यात यावे अशा सूचना दिल्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डॉ.के.आर.यादव यांच्या निधनामुळे बहुआयामी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड – कुलगुरू डॉ.राजनीश कामत

डॉ.के.आर.यादव यांच्या निधनामुळे बहुआयामी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड – कुलगुरू डॉ.…