Home Uncategorized गटई कामगार लाभार्थ्याना  गटई स्टॉलचे वितरण.

गटई कामगार लाभार्थ्याना  गटई स्टॉलचे वितरण.

6 second read
0
0
5

no images were found

गटई कामगार लाभार्थ्याना  गटई स्टॉलचे वितरण.

 कोल्हापूर: – गटई कामगारांनी गटई स्टॉलचा वापर गटई कामासाठी करून आपले आर्थिक जीवनमान उंचवावे असे प्रतिपादन समाजकल्याण कोल्हापूरचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह हातकणंगले येथे पात्र व मंजूर 22 लाभार्थ्यांना मा समाजकल्याण कोल्हापूरचे सहायक आयुक्त सचिन साळे व विशेष समाजकल्याण अधिकारी अक्षय कुरणे, यांचे  हस्ते गटई स्टॉलचे वितरण  करण्यात आले. यावेळी समाजकल्याण निरीक्षक चित्रा शेंडगे, वसतिगृहाचे अधीक्षक अशोक करमळकर, कनिष्ठ लिपिक शाहू प्रधान तसेच तालुका समन्वयक सचिन कांबळे व वसतिगृह  कर्मचारी अमर बोरगे  व  इतर कर्मचारी उपस्थित होते.

शासन निर्णयानुसार गटई कामगारांना स्टॉल देण्याची योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबवली जाणारी एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (चर्मकार व इतर तत्सम) प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणाऱ्या (गटई कामगार) गरीब व्यावसायिकांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी १००% अनुदानावर मोफत लोखंडी पत्र्याचे स्टॉल दिले जातात. तसेच स्टॉल सोबत इतर साहित्य खरेदी अनुदान ५०००/- डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या बैंक खातेवर वर्ग करणेत येतात.

या योजनेमधून वितरित करण्यात येत असलेले गटई स्टॉल हे पहिल्या टप्प्यातील असून या कार्यालयाकडे पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जस-जसे शासनाच्या वतीने गटई स्टॉल प्राप्त होतील तसे टप्प्याटप्प्याने तालुक्याच्या ठिकाणी गटई स्टॉलचे वितरण करणेत येईल तसेच  आज वितरण करणेत आलेल्या गटई स्टॉलचा वापर हा गटई कामासाठीच करावा व आपले जीवनमान उंचवावे असे मत या प्रसंगी मा. सचिन साळे, सहायक आयुक्त, समाजकल्याण कोल्हापूर यांनी वेक्त केल. या प्रसंगी 22 गटई कामगारांना गटई स्टॉलचे वितरण करणेत आले,

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

क्लायमेट सत्याग्रह’ जनतेच्या माध्यतातून पुढे जाणे आवश्यक – प्रा.चेतन सिंह सोलंकी

क्लायमेट सत्याग्रह’ जनतेच्या माध्यतातून पुढे जाणे आवश्यक – प्रा.चेतन सिंह सोलं…