Home क्राईम कोडोली-बोरपाडळे मार्गावर गॅस टँकर पलटी

कोडोली-बोरपाडळे मार्गावर गॅस टँकर पलटी

1 second read
0
0
130

no images were found

  1. कोडोली-बोरपाडळे मार्गावर गॅस टँकर पलटी
    बोरपाडळे : कोडोली-बोरपाडळे मार्गावर बोरपाडळे गावाजवळ गॅस टँकरवरील चालका=चा ताबा सुटून टँकर पलटी झाला. टँकर पलटी झाल्याने टाकी लिकेज होऊन गॅस गळती सुरू झाली. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोडोली ते बोरपाडळे हा मार्ग कोडोली पोलिसांकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
    पन्हाळा तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या २ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मार्ग तात्पूर्ता बंद ठेवल्यावर पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

गॅसने भरलेला टँकर जयगडहून नागपूरला जात होता. बोरपडळे गावालगत भूपाचीतळी कमानीजवळ गॅस टँकरच्या चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. या अपघातात गॅस टँकर पलटी होऊन, गॅस गळती सुरू झाली. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करत, परिसरातील सुमारे तीनशे मीटरपर्यंत असलेली सर्व हॉटेल, दुकाने, बंद करण्यात आली.

अपघात स्थळी ताबडतोब पन्हाळाचे तहसीलदार रमेश शेंडगे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, जिल्हा आपत्ती व्यवस्थानचे कर्मचारी, दोन क्रेन, कोल्हापूर व पन्हाळा येथील अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान त्यांनी या परिसरात घरात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरीत केले व घरातील चुली पेटवण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…