no images were found
मटका बुकी मालक, व्हिडीओ गेम चालक यांच्यावर कारवाई करा; अन्यथा आंदोलनाचा म.न.वा.से.चा इशारा
कोल्हापूर : मटका व व्हिडिओ गेम अवैध व्यवसाया संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मटका बुकी मालक व्हिडीओ गेम चालक यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करून लाखो गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्यांचा व्यवसाय ताबडतोब बंद करून जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे सर्व संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राजवाडा करवीर शाहुपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी तेथील पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. तसेच वरील विषयावर शहर डी.वाय.एस.पी.मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात करवीर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यलयातही निवेदन देण्यात आले.
४ दिवसात हे व्यवसाय बंद झाले नाहीत; तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे खड्डे खणून आम्ही स्वतःला ४-५ फुट गाडून घेऊ; जोपर्यंत मटका व्यवसायातील विजय पाटील, (राजवाडा) आयुब जमादार (शाहुपुरी, करवीर हद्दीतील) मोठे धेंडे त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत खड्ड्यातून आम्ही बाहेर पडणार नाही. अमित साहेब यांच्या दौऱ्यानंतर हे आंदोलन अगदी शंभर टक्के घेणार म्हणजे घेणारच आणि सामान्य गोरगरिबांची सुटका केल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही धाकट धपट शाहीला आम्ही भिक घालणार नाही म.न.वा.से.चे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी असा इशारा दिला आहे