
no images were found
आम्ही सगळ्या अलर्जीवर उपचार करू, चित्रा वाघ यांचा उर्फीला इशारा
मुंबई : उर्फी आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू, असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला आहे. चित्रा वाघ यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उर्फीला डिवचलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वैराचार नाही. फॅशन व नांगनाच यात फार फरक आहे. ऐकलं तर ठीक. नाही तर आम्ही सगळ्या अलर्जीवर उपचार करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
एका आईने मला एसएमस पाठवला होता. त्यामुळे मी उर्फी विषयावर बोलले. मुली कोणाचा आदर्श घेणार? महाराष्ट्रात हे चालणार नाही. आधी कपडे घाला. मग ठरवा, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली आहे. उर्फी जावेदने सांगितले की, तिच्या शरीराला कपड्यांची अॅलर्जी आहे. तिने पूर्ण कपडे किंवा लोकरीचे कपडे घातले तर तिला पुरळ उठतात. उर्फी म्हणाली, “मी कपडे का घालत नाही, कारण माझी प्रकृती गंभीर आहे. जेव्हा मी पूर्ण कपडे घालते तेव्हा माझे शरीरावर लगेच असे पॅच येतात.” उर्फीने आतपर्यंत तिच्या फॅशनमध्ये मोबाईल, प्लेट, मच्छरदानी, उलटा शर्ट, गोणी, फोटो कॉपी, , सिम कार्ड अशी न संपणारी लिस्टआहे. या सगळ्यांचा वापर करून ड्रेस तयार केला आहे.