
no images were found
RBI ने बँक खात्याशी संबंधित बदलले नियम
मुंबई : रबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या बँक खातेधारकांनी आधीच त्यांची वैध कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्यांच्या पत्त्यात कोणताही बदल झालेला नाही, त्यांना आता त्यांचे KYC करावे लागेल. तपशील अपडेट करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही.
आरबीआयचे म्हणणे आहे की, केवायसी माहितीमध्ये कोणताही बदल न झाल्यास खातेधारक त्यांच्या ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम किंवा अन्य डिजिटल माध्यमातून स्व-घोषणा पत्र सादर करू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेशी संबंधित नियम आणि इतर गोष्टी बदलत असते. या वेळी आरबीआयने बँक खात्याशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत.