Home सामाजिक रानभाज्या प्रदर्शनाची सांगता ; पाककृती स्पर्धेचा निकाल जाहीर

रानभाज्या प्रदर्शनाची सांगता ; पाककृती स्पर्धेचा निकाल जाहीर

6 second read
0
0
36

no images were found

रानभाज्या प्रदर्शनाची सांगता ; पाककृती स्पर्धेचा निकाल जाहीर

कोल्हापूर/ प्रतिनिधी : सह्याद्री डोंगररांगा ,कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात, जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी, पौष्टिक व औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन, निसर्गप्रेमींनी या रानभाज्या आपल्या परसबागेत लावाव्यात, तसेच शेतकऱ्यांनी महत्वाच्या दुर्मिळ रानभाज्यांची शेतात लागवड करुन त्यांचे फायदे मिळवावेत ह्यादृष्टीने एनजीओ कंपॅशन २४,कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्यावतीने श्रावण मासाचे औचित्य साधून जवळपास २०० हुन अधिक रानभाज्यांचे माहितीपूर्ण प्रदर्शन टाकाळा येथील श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, साईक्स एक्सटेंशन येथे भरविण्यात आले होते. या दोन दिवसीय प्रदर्शनाची सांगता आज झाली. तसेच प्रदर्शनादरम्यान भरवण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. पाककृती स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे:
*ग्रामिण विभाग -*
प्रथम क्रमांक- प्रिया पाटील
द्वितीय क्रमांक- पूजा पाटील
तृतिय क्रमांक – निता पडवळ
उत्तेजनार्थ- मीनाक्षी जंगम
सायली लाड
*शहरी विभाग -*
प्रथम क्रमांक- शैलजा गिरीगोसावी
द्वितीय क्रमांक- रजनी यादव
तृतिय क्रमांक- गायत्री मंगाले
उत्तेजनार्थ-
श्रध्दा पेंडुरकर
मनिषा तोडकर

अतिशय दुर्मिळ अशा रानभाज्यांच्या या प्रदर्शनास कोल्हापूरकरांनी तसे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दोन दिवसात भरभरून प्रतिसाद दिला. गारंबीची ४ फुटी शेंग ,टेटूची तलवारीसारखी २ फुटी शेंग, खाजकुहीलीचे वेल,शेरणी ,चन्नी चे वेल, सोनार वेल,कांड्याचित्रक, गाजरीची भाजी, खरशिंग शेंगा, कडवी,अमरकंद, नळीची भाजी, समुद्रशोक, दगडावर वाढणारा जैताळू, खडक अंबाडी, गिरजाला, सागरी किनाऱ्यावर वाढणारी समुद्रीय घोळ, रुकाळू ( वृक्षांवर उगवणारा अळू ), तीनतोंडी , मांजरी, बाफेली, सफेद मुसळी,कडवी, कोळयाचो माड अशा अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या तसेच करटोली, दिंडा, कुडा,आंबुशी, पाथरी,कुरडू ,बांबू कोंब ,रानगवर, केना,पानांचा ओवा, कपाळफोडी, चिवळ, आघाडा,काटेमाठ, घोळभाजी,अंबाडा, सुरण , टाकळा ,मटारू, भुई आवळी, भारंगी ह्या औषधी गुणांनीयुक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्याची ह्या प्रदर्शनात लोकांना ओळख आणि चांगली माहिती मिळाली. मोहन माने, कोल्हापूर यांच्या परिश्रमातून रानभाज्यांचे हे माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांची माहिती घेऊन ,चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात असे प्रतिपादन एनजीओ कंपेंशन २४, कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड ह्यांनी समारोपाप्रसंगी केले. माजी खासदार प्रा. संजय मंडलिक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
निसर्ग अंकुरचे अध्यक्ष डॉ.मधुकर बाचुळकर, मंजिरी कपडेकर , अभिजित पाटील, को -चेअरमन अमृता वासुदेवन, मोहन माने, शरद अजगेकर, राजेंद्र केरकर, स्मिता माने, अरविंद भांगरे, प्रा.प्रमोद दोशी आदी उपस्थित होते.विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. मंजिरी कपडेकर, मोहन माने, ऐश्वर्या जामसंडेकर,डॉ. भूषण काळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…