no images were found
टिओडी मीटर: स्मार्ट वीज वापरासाठी नवीन उपाय
टिओडी (टाइम ऑफ डे) मीटर ही एक आधुनिक ऊर्जा मोजणी प्रणाली आहे, जी ग्राहकांना त्यांच्या वीज वापरावर अधिक नियंत्रण मिळवण्यास मदत करते. केंद्र सरकारच्या आरपीएसईसी अंतर्गत, देशभरात टिओडी मीटरची बसवणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. त्यासाठी खाली, टिओडी मीटरविषयी सर्व आवश्यक माहिती दिली आहे.
टिओडी मीटर इन्स्टॉलेशन का आवश्यक आहे?
टिओडी मीटर्समुळे वीज वापरावर नियंत्रण ठेवणे सोपे होते आणि वीज वितरण विभागाची कार्यक्षमता वाढते. योजनेअंतर्गत देशभरात 25 कोटी मीटर बसवण्याचे उद्दिष्ट आहे. या मीटरच्या साहाय्याने ग्राहकांना त्यांच्या वीज वापराबाबत माहिती मिळेल आणि ते त्यावर नियंत्रण ठेवू शकतील.
टिओडी मीटर्स वीज जास्त वापरतात का?
टिओडी मीटर ऊर्जा वापर प्रमाणबद्ध करतात आणि त्याबाबत माहिती पुरवून, ग्राहकांना त्यांच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करतात.
इन्स्टॉलेशन टीमशी संपर्क
ग्राहक टिओडी मीटर बसवण्यासाठी आलेल्या टीमच्या अधिकृत प्रतिनिधीसह थेट संपर्क करू शकतात. प्रतिनिधीकडे महावितरणचे अधिकृतता पत्र किंवा आयडी कार्ड असते, जे ग्राहकांनी तपासावे.
टिओडी मीटर बसवताना वीज बंद राहण्याची वेळ
टिओडी मीटर बसवताना अंदाजे 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वीज बंद राहणार नाही.
जुन्या मीटरच्या तुलनेत टिओडी मीटरचे फायदे
टिओडी मीटर वापरल्यास रिअल-टाइम वीज वापर पाहता येतो आणि मीटर रीडिंग अचूक असते. अद्ययावत ऊर्जा वापर मॉनिटरिंगमुळे ग्राहकांना सुजाण निर्णय घेता येतात. वीज वापर दिवसातील वेळेनुसार, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या ऑफ-पीक तासांमध्ये विभागला जातो, ज्यामुळे ऑफ-पीक तासांमध्ये वीज वापर केल्यास प्रति युनिट दरात बचत होते. तसेच, सौर ऊर्जेसाठी (सकाळी 6 ते संध्याकाळी 6) प्रति युनिट 20% सवलत मिळते.
टिओडी मीटरसाठी वीज दर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत वेगवेगळ्या युनिट वापरानुसार ठरवलेले आहेत.
0 ते 100 युनिट वापरल्यास सामान्य मीटरवर प्रति युनिट 1.61 रुपये दर लागू होतो, तर टिओडी मीटरवर हा दर 1.29 रुपये आहे. 101 ते 300 युनिट वापरल्यास सामान्य मीटरवर दर 3.90 रुपये आणि टिओडी मीटरवर 3.36 रुपये आहे. 301 ते 400 युनिटसाठी सामान्य मीटर दर 7.91 रुपये तर टिओडी मीटर दर 6.56 रुपये आहेत. 400 पेक्षा जास्त युनिट वापरल्यास सामान्य मीटरवर दर 9.75 रुपये तर टिओडी मीटरवर दर 8.11 रुपये आहे.
ग्राहकांसाठी शुल्क
टिओडी मीटर बसवणे पूर्णपणे फ्री आहे आणि सबसिडीतून दिले जाते.स्मार्ट बना, जाणते व्हा. प्रत्येक मीटर, टिओडी मीटर.