Home राष्ट्रीय माजी सैनिक राष्ट्राच्या सन्मानाचे खरे रक्षक – लेफ्टनंट जनरल डी. एस कुशवाह 

माजी सैनिक राष्ट्राच्या सन्मानाचे खरे रक्षक – लेफ्टनंट जनरल डी. एस कुशवाह 

8 second read
0
0
70

no images were found

माजी सैनिक राष्ट्राच्या सन्मानाचे खरे रक्षक – लेफ्टनंट जनरल डी. एस कुशवाह 

    कोल्हापूर : आपल्या देशाचे माजी सैनिक हे राष्ट्राच्या सन्मानाचे सच्चे रक्षक आहेत. त्यांचे कल्याण ही आपली सर्वात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल डी.एस. कुशवाह महाराष्ट्र गोवा व गुजरात क्षेत्राचे एव्हीएसएम (AVSM) एस  एम (SM) जनरल ऑफीसर कमांडिंग यांनी केले.

    येथील मिलिटरी स्टेशन येथे माजी सैनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रातील नाईकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक माजी सैनिक, वीर नारी, वीर माता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता. या रॅलीमध्ये त्यांचा सत्कार, निवृत्ती वेतन इ. सी. एच. एस, सी. एस. डी. आणि इतर कल्याणकारी योजनांबाबत जागृती, आरोग्य सेवा कौशल्य विकास आणि पुनर्वसन तसेच माजी सैनिक आणि अधिकाऱ्यांसोबत संवाद आदींबाबत साधक बाधक विचार विनिमय करण्यात आला. सशस्त्र सैन्य दल आणि माजी सैनिक समुदायामधील बंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याची व पाठिंबा देण्याची प्रतिज्ञा घेवून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राष्ट्रीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…