Home मनोरंजन कलाकार सांगत आहेत आपल्या प्रिय प्रवासाच्या आठवणी आणि भारतात फिरण्याच्या आवडीविषयी

कलाकार सांगत आहेत आपल्या प्रिय प्रवासाच्या आठवणी आणि भारतात फिरण्याच्या आवडीविषयी

18 second read
0
0
30

no images were found

 कलाकार सांगत आहेत आपल्या प्रिय प्रवासाच्या आठवणी आणि भारतात फिरण्याच्या आवडीविषयी
दर वर्षी जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने प्रवासाचे आणि पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. जागतिक पर्यटन दिन म्हणजे नव्या ठिकाणांचा शोध, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि नव्या जागांच्या शोध घेण्यातील गंमत. भारत हे पहिल्यापासून वारसा, खाद्यसंस्कृती आणि नयनरम्य स्थळांचे डेस्टिनेशन आहे. या अद्भुत देशात नवनव्या जागांचा शोध घेण्याचा आनंद आणि या प्रवासाच्या आठवणी याविषयी सांगत आहेत, सोनी सबचे कलाकार रजत वर्मा, ऋषी सक्सेना, करुणा पांडे, आशी सिंह आणि अभिषेक वर्मा. काही अस्पर्श ठिकाणांपासून ते प्रसिद्ध पर्यटन स्थळांपर्यंतच्या या हृद्य आठवणींमधून या कलाकारांचे पर्यटनाविषयी आणि आपल्या देशाची ओळख असणाऱ्या सांस्कृतिक विविधतेविषयीचे प्रेम दिसून येते.

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत विराटची भूमिका करणारा रजत वर्मा म्हणतो, “मी देशाची राजधानी, दिल्लीचा आहे. हे ऐतिहासिक शहर खूप गजबजलेले असते. कॉलेजच्या दिवसात हौज खास या ठिकाणी आम्हा मित्रांचा अड्डा असायचा. ही जागा ‘रॉकस्टार’ मुळे पुढे प्रसिद्ध झाली. कुतुब मिनार जवळच्या कुतुब रोड वर फिरायला आम्हाला आवडायचे. चाँदनी चौक येथील नॉन-व्हेज पदार्थ आणि दही भल्ले, CPचे गजबजलेले कॅफे, करोल बागेतील छोले भटुरे आणि पश्चिम दिल्लीतील अद्भुत स्ट्रीटफुड यांच्याशिवाय तर दिल्लीची कल्पनाच होऊ शकत नाही. खरं सांगतो, तुम्ही एकदा त्याची चव घेतलीत की तुम्हाला जीवनात नक्कीच रस येतो!”

 ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत संजयची भूमिका करणारा ऋषी सक्सेना म्हणतो, “मी जयपूरचा आहे, हे शहर इथले खाद्य पदार्थ आणि स्थापत्य याबद्दल प्रसिद्ध आहे. इथे प्रसिद्ध हवा महल आणि आमेर फोर्ट आहे तसेच खरेदीदारांचे आवडते जोहरी आणि बापू बाजारसारखे गजबजलेले बाजारही आहेत. अर्थात, मी स्वतः या बाजारांमध्ये फारसा जात नाही, पण बाहेरून येणाऱ्या लोकांना मात्र त्याचे खूप आकर्षण आहे. मी स्वतः खाण्याचा शौकीन असल्याने मी जयपूरच्या घेवरचा उल्लेख केल्याशिवाय राहू शकत नाही. खास करून मलाई घेवर मला फारच आवडतो. माझ्यासाठी घेवरच्या प्रत्येक घासात जयपूरचा स्वाद साठवलेला असतो!”

 पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “माझ्यासाठी प्रवास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अलीकडे मला फिरायला वेळ मिळत नाही, पण लहानपणी आमचे खूप फिरणे व्हायचे, कारण माझे वडील सैन्यात होते आणि दर दोन वर्षांनी त्यांची नव्या ठिकाणी बदली व्हायची. आम्ही या निमित्ताने भारतात खूप फिरलो, इथले खाद्यपदार्थ, संस्कृती, लोक पाहिले. आणि त्या आठवणी अजून माझ्या मनात ताज्या आहेत. कोडाई कॅनाल ही माझी सगळ्यात आवडती जागा आहे. माझे आई-वडील, बहीण आणि आमचा जर्मन शेफर्ड शेरी याच्या सोबतच्या तिथल्या खूप सुंदर आठवणी आहेत. संस्कृती, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीने भारत किती समृद्ध देश आहे! डेहराडून, उधमपूर, चेन्नई आणि कोडाई कॅनाल ही माझी प्रिय ठिकाणे आहेत. प्रवास करताना तुम्हाला स्वतःला अधिक जाणण्याची संधी मिळते. आणि मला वाटते, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी इकट्याने भटकंती केलीच पाहिजे.”

 ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत कैरीची भूमिका करणारी आशी सिंह म्हणते, “मला फिरायला फारच आवडते. प्रवास केल्याने मी रीचार्ज आणि स्थिर होते. हिल स्टेशन्स मला विशेष आवडतात. मनाली आणि मसूरी सारख्या ठिकाणी जाऊन कसे शांत वाटते! माझ्यासाठी प्रवास म्हणजे केवळ प्रेक्षणीय स्थळे बघणे नाही. प्रवास म्हणजे निसर्गाशी एकरूप होणे, स्थानिक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणे आणि तेथील लोक कसे राहतात हे जवळून बघण्यासाठी तेथील रस्त्यांवरून भटकंती करणे. मला तर वाटते, प्रत्येक प्रवास तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतो, फक्त बाह्य जगाविषयीच नाही, तर तुमच्या स्वतःविषयी देखील. मी जेव्हा जेव्हा शूटिंगसाठी प्रवास करते, तेव्हाही मी आवर्जून स्थानिक बाजारात जाते आणि तेथील प्रसिद्ध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेते. ती जागा आणि तेथील लोक यांच्याशी तादात्म्य पावण्याची ही माझी पद्धत आहे.”

 ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत शौर्यची भूमिका करणारा अभिषेक वर्मा म्हणतो, “माझ्या साठी प्रवास म्हणजे अनुभव! इतिहास आणि साहस यांचे मिश्रण असेल, अशा जागा मला आवडतात. राजस्थान मला फार आवडते. मेहरानगड आणि आमेर फोर्टवर फिरायला आणि तेथील स्थानिक लोकसंगीतात रममाण व्हायला मला आवडते. मला रोड ट्रिप्स देखील फार आवडतात. मग तो जयपूर-दिल्लीचा प्रवास असो किंवा समुद्री वारा अंगावर घेत केलेला गोव्याचा प्रवास! माझ्या प्रवासांमध्ये खाद्यपदार्थांचे मोठे स्थान असते. स्थानिक लोकांचा सल्ला घेऊन मी तेथील खास स्थानिक खाद्य पदार्थ अजमावून पाहतो. प्रवास मला सर्वार्थाने प्रेरित आणि जमिनीशी बांधून ठेवतो!”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…