
no images were found
इलेक्ट्रीकल व ईएनटीसीच्या २१ विद्यार्थ्यांची ऍक्युटेक पॉवर सोल्युशन कंपनीत निवड
इचलकरंजी (प्रतिनिधी): डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल व ईएनटीसी इंजिनिअरींग विभागातील २१ विद्यार्थ्यांची ऍक्युटेक पॉवर सोल्युशन या नामांकीत कंपनीमध्ये निवड झाली आहे. ऍक्युटेक पॉवर सोलुशन ही युपीएस पॉवर बॅकअप मधील नामांकित कंपनी आहे. ऍक्युटेक पॉवर सोल्युशन या कंपनीतील तज्ञ मंडळींनी डीकेटीईस भेट दिली व इलेक्ट्रीकल व ईएनटीसी इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची इंटरव्हयुवद्वारे निवड केली यामध्ये डीकेटीईतील तब्बल २१ विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजेवरती निवड झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डीकेटीई आणि ऍक्युटेक पॉवर सोलुशन, मुंबई यांच्यामध्ये संयुक्त विद्यमाने बी.टेक. इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग आणि बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेल्युकम्युनिकेशन मधील विद्यार्थ्यांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स हे केंद्र सुरु केले आहे. डीकेटीईमध्ये साकारलेले ऍक्युटेक या कंपनीच्या अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग मधील विद्यार्थ्यांना यु.पी.एस. क्षेत्रातील अदयायवत प्रशिक्षण देण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात येईल. तसेच या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये पॉवर टेक्नॉलॉजी क्षेत्रात विद्यार्थी रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट प्रकल्प पूर्ण करतील व त्यामुळे त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळेल.
डीकेटीई ही संस्था इंजिनिअरींगमधील विद्यार्थ्याना प्लेसमेंट गुणवत्ता वाढीसाठी व उद्योजकता गुणांचे वाढ करुन त्या विद्यार्थ्यांना कार्यक्षम बनविण्यासाठी व तंत्रशिक्षणामधील विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजवरती नोकरी देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमधील नवनविन बदलांचा अभ्यास करण्यासाठी इंडस्ट्री व्हीजीट, इंडस्ट्री ट्रेनिंग यांचे वेळोवेळी आयोजन केले जाते यामुळेच डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे नेहमीच दर्जेदार प्लेसमेंट होत असते.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार व उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, इटीसी विभागप्रमुख डॉ एस.ए.पाटील, इलेक्ट्रीकल विभागप्रमुख प्रा. डॉ. आर.एन.पाटील, टीपीओ जी.एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.