Home उद्योग भारताला प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सचे जागतिक केंद्र बनवणे हे आमचे ध्येय : मनोज शाह

भारताला प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सचे जागतिक केंद्र बनवणे हे आमचे ध्येय : मनोज शाह

27 second read
0
0
77

no images were found

भारताला प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सचे जागतिक केंद्र बनवणे हे आमचे ध्येय : मनोज शाह

 

जागतिक प्लास्टिक व्यापारात भारत निर्णायक उडी घेण्यासाठी सज्ज आहे. “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या ध्येयदृष्टीखाली, ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एआयपीएमए) ने पुढील तीन वर्षांत भारतातील प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सच्या निर्यातीला चौपट वाढवण्याची महत्वाकांक्षी रणनीती जाहीर केली आहे. तसेच २४ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेची घोषणाही करण्यात आली. हि परिषद २४ सप्टेंबर २०२५ रोजी हॉटेल ललित, मुंबई येथे होणार आहे.

      एआयपीएमए  च्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्री. अरविंद मेहता म्हणाले, “हा फक्त व्यापार विस्तार नसून, भारताला जागतिक प्लास्टिक हब बनवण्याचा राष्ट्रीय मिशन आहे.”श्री. मेहता यांनी सांगितले की, जागतिक प्लास्टिक फिनिश्ड वस्तूंचा व्यापार सुमारे १,३०० अब्ज डॉलर्स इतका आहे, परंतु भारताचा हिस्सा केवळ १२.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच एकूण ०.९६% इतका आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेत एकट्याने ७२.३५ अब्ज डॉलर्स किमतीची प्लास्टिक उत्पादने आयात केली जातात, परंतु त्यात भारताचा वाटा फक्त १.२% आहे. योग्य धोरणांमुळे २-३ नवीन पॉलिमर प्लांट्स, प्लास्टिक मशिनरी व सहयोगी युनिट्समध्ये १००% वाढ, एमएसएमई -आधारित उत्पादनात मोठी भर पडू शकते. रोजगार व कौशल्यविकासात भर पडेल. चीनच्या कॅन्टोन  फेअर च्या उदाहरणावरून योग्य शासकीय धोरणे निर्यात कशी बदलू शकतात हे स्पष्ट होते.

         भारतातील प्लास्टिक उद्योग प्रामुख्याने एमएसएमई -आधारित आहे. देशभरात ५०,००० हून अधिक युनिट्स कार्यरत असून या क्षेत्रात सुमारे ४.६ दशलक्ष लोक थेट व अप्रत्यक्षरित्या रोजगार करतात. निर्यात लक्ष्य साध्य झाले तर रोजगार संधी ६ दशलक्षांवर पोहोचू शकतात.

 

एआयपीएमए  चे अध्यक्ष श्री. मनोज आर. शाह यांनी म्हटले, “ही फक्त व्यापाराची गोष्ट नाही; तर लाखो एमएसएमई  ना सक्षम करणे, देशभरात रोजगार निर्माण करणे आणि भारताला प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सचे जागतिक केंद्र बनवणे हे आमचे ध्येय आहे.”

        त्यांनी पुढे सांगितले की, एआयपीएमए  च्या एक्स्पोर्ट सेल ने २१ देश व ९ एचएसएन कोड्सचा सखोल अभ्यास केला आहे. यात भारताचा प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्स निर्यात हिस्सा १.२% आहे, तर चीनचा २२% व व्हिएतनामचा ४% आहे. अभ्यासात युएसए, चीन, जर्मनी, मेक्सिको, फ्रान्स, इटली, यूके, कॅनडा, पोलंड, नेदरलँड्स, तुर्की, जपान, स्पेन, बेल्जियम, यूएई, ब्राझिल, चिली, इथिओपिया, घाना, केनिया व नायजेरिया या देशांचा समावेश आहे.

      हा अभ्यास २०२१ ते २०२३ या १५ महिन्यांच्या कालावधीत करण्यात आला. यात निष्कर्ष काढण्यात आला की भारताकडे गुणवत्ता व किमतीतील स्पर्धात्मकतेमुळे चीन व व्हिएतनामची जागा घेण्याची प्रबळ क्षमता आहे.

  २०२६ मध्ये “प्लास्टिक वर्ल्ड 2026 प्रदर्शनी” चे आयोजन २३ ते २६ मार्च २०२६ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे केले जाईल. ही भारताची पहिली आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी असेल जी केवळ प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्ससाठी समर्पित असेल. घरगुती वस्तूंपासून आरोग्य, वैद्यकीय, ऑटोमोटिव्ह व क्रीडा क्षेत्रातील प्लास्टिक उत्पादने जागतिक खरेदीदारांसाठी येथे सादर केली जातील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…