Home राजकीय मुंबईत हवेत चालणारी डबल डेकर बस, दोनशे प्रवासी उडणार, गडकरींनी मुंबईकरांना नवं स्वप्न दाखवलं

मुंबईत हवेत चालणारी डबल डेकर बस, दोनशे प्रवासी उडणार, गडकरींनी मुंबईकरांना नवं स्वप्न दाखवलं

0 second read
0
0
106

no images were found

मुंबईत हवेत चालणारी डबल डेकर बसदोनशे प्रवासी उडणारगडकरींनी मुंबईकरांना नवं स्वप्न दाखवलं

हवेत उडणारी बस, रोपवे कार, टोलनाके कायमचे बंद, यासारख्या ‘उडत्या’ घोषणांनी कायम चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईकरांना आणखी एक स्वप्न दाखवलं आहे. हवेत चालणारी डबल डेकर बस मुंबईत हवीये, त्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत, असं गडकरी म्हणाले. पवई ते नरिमन पॉईंट हवेतून प्रवास करण्याचं स्वप्नरंजन गडकरींनी मुंबईकरांसाठी केलं. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसमोर नितीन गडकरी यांनी जबरदस्त भाषण केलं.नितीन गडकरी काय म्हणाले?

मास रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीचा वापर व्हावा. बंगळुरुत इतका ट्रॅफिक जाम आहे, इतकं प्रदूषण आहे की, मी तिथल्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं, आमच्याकडे एक प्रेझेंटेशन झालंय, हवेत चालणारी डबल डेकर बस, मुंबईत अशीच हवीये, ती बनवण्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. दोनशे लोक वरच्या वर हवेतून जाणार, असं गडकरी सांगत होते.
पवईतून डोंगराच्या वरुन निघून नरीमन पॉईंटला वरच्या वर जाणार, तुमचा प्रवास सुलभ होईल आणि वेळही वाचेल, वाहतूक व्यवस्थेत नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला हवा, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.
पुण्यासाठीही घोषणा-  “पुणे शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी नितीन गडकरी यांनी उडत्या बसचा पर्याय काही महिन्यांपूर्वी दिला होता. केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे, महापालिकेने तसा प्रस्ताव द्यावा”, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं
“देशभर १६५ रोप वे आम्ही बांधत आहोत. त्यासाठी महाराष्ट्रातील काही प्रस्ताव आहेत. पुणे शहराच्या वाहतूक कोंडीचा पीएमआरडीने अभ्यास करावा. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. १२० ते १५० लोक त्यातून प्रवास करु शकतात. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र बसून चर्चा करावी. निधीची चिंता नाही. केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …