Home राजकीय प्रा.जालंदर पाटील यांच्या नियुक्तीचा शेतकरी चळवळीस फायदा होईल : आमदार राजेश क्षीरसागर

प्रा.जालंदर पाटील यांच्या नियुक्तीचा शेतकरी चळवळीस फायदा होईल : आमदार राजेश क्षीरसागर

6 second read
0
0
158

no images were found

प्रा.जालंदर पाटील यांच्या नियुक्तीचा शेतकरी चळवळीस फायदा होईल : आमदार राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात लोकप्रिय पक्ष ठरत आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ठेवली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांच्या न्यायहक्कासाठी व्यासपीठ निर्माण व्हावे, यातून शेतकरी बांधवांच्या समस्यांचे जलदरितीने निवारण व्हावे, या उद्देशाने उप मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शेतकरी सेनेची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यालाही न्याय देण्याची त्यांची भूमिका मा.शिंदे साहेबांची असून, एका सर्वसामान्य कुटुंबातून निर्माण झालेले अनुभवी नेतृत्व प्रा.जालंदर पाटील यांच्या नियुक्तीचा शेतकरी चळवळीस फायदा होईल, अशा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. शिवसेना अंगिकृत शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी नवनियुक्तीबद्दल प्रा.जालंदर पाटील आणि सचिव श्री.जनार्दन पाटील यांचा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, राजकीय घराणेशाहीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना उच्चविद्याविभूषित असूनही शेती आणि शेतकरी बांधवांसाठी गेली २५ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रभर एक अभ्यासू वक्ता म्हणून झंजावाती काम केलेल्या प्रा.जालंदर पाटील शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष झाले याचा मला मनस्वी आनंद वाटतो. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच शेतकरी बांधवांच्या हितासाठी होईल, अशी सदीच्छा देत आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रदेशाध्यक्ष प्रा.जालंदर पाटील आणि सचिव जनार्दन पाटील यांच्या भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.     

    

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…