no images were found
अदाणी स्किल्स अँड एज्युकेशन ने लाँच केला ‘कर्म शिक्षा’ – एनसीव्हीईटी मान्यताप्राप्त अग्रगण्य वर्क-स्टडी डिप्लोमा प्रोग्रॅम
अहमदाबाद,: अदाणी ग्रुपच्या कौशल्य विकास विभाग अदाणी स्किल्स अँड एज्युकेशन (एएसई) ने आज कर्म शिक्षा या अभिनव वर्क-स्टडी डिप्लोमा प्रोग्रॅमची घोषणा केली.हा प्रोग्रॅम नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (एनसीव्हीईटी), कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) यांच्याकडून मान्यता प्राप्त आहे.
‘कर्म शिक्षा’ हा प्रोग्रॅम दहावी व बारावी उत्तीर्ण (सर्व शाखा) तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उद्योगाशी जोडलेले, रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.यात वर्गातील शिक्षणासोबत अदाणी समूहाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये – पोर्ट्स, पॉवर, सोलर मॅन्युफॅक्चरिंग, ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिक्स – प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळेल.
या प्रसंगी अदाणी समूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदाणी म्हणाले,कर्म शिक्षा’द्वारे आम्ही विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर व्यावहारिक कौशल्ये देत आहोत जी त्यांच्या संधींचे नवे दरवाजे उघडतील. हे आमच्या ‘हम करके दिखाते हैं’ या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे – विचार कृतीत आणणे, दृष्टी वास्तवात आणणे – आणि तरुण पिढीला ‘विकसित भारत’ घडवण्यात सक्षम करणे.”
प्रोग्रॅमची ठळक वैशिष्ट्ये:
· संपूर्ण देशभरातून मेरिट-आधारित विद्यार्थ्यांची निवड
· 2 वर्षांचा वर्क-स्टडी डिप्लोमा – *पोर्ट्स मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट*
· एनसीव्हीईटी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र (अदाणी स्किल्स अँड एज्युकेशन सोबत)
· उद्योगसमवेत शिक्षण आणि मल्टी-सेक्टर अनुभव
· विद्यार्थ्यांसाठी आकर्षक स्टायपेंडची सुविधा
· उच्च शिक्षणाच्या संधी, डिग्री प्रोग्रॅममध्ये लॅटरल एन्ट्री
या मॉडेलमुळे विद्यार्थ्यांना अर्न-व्हाइल-यू-लर्न पद्धतीचा लाभ मिळेल,म्हणजे शिक्षण घेतानाच आर्थिक स्वावलंबन. हा डिप्लोमा राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असून थेट रोजगार तसेच उच्च शिक्षणासाठी मार्ग मोकळा करतो.
अदाणी स्किल्स अँड एज्युकेशनचे सीईओ श्री.रॉबिन भौमिक म्हणाले,कर्म शिक्षा हा फक्त डिप्लोमा नाही – तो संधींचा दरवाजा आहे.Skill2Employ या आमच्या मार्गदर्शक आराखड्याद्वारे आम्ही प्रत्येक कौशल्याला रोजगाराशी जोडत आहोत आणि प्रत्येक शिकणाऱ्याला भारताच्या प्रगतीकथेचा भाग बनवत आहोत. अकॅडमिक्स आणि कार्यस्थळावरील शिक्षण यांचा संगम घडवून आम्ही भविष्याभिमुख, उद्योगसिद्ध व्यावसायिकांची शृंखला उभारत आहोत.
‘कर्म शिक्षा’च्या लाँचमुळे अदाणी स्किल्स अँड एज्युकेशनने कौशल्य विकास, रोजगारसंधी आणि शैक्षणिक उत्कृष्टतेबाबतची आपली वचनबद्धता अधिक बळकट केली आहे. एनसीव्हीईटी शी समन्वय साधून आणि उद्योगांशी जवळून काम करून एएसई भारतातील व्यावसायिक, कौशल्याधारित शिक्षणाला नव्या दिशेने नेणारे स्केलेबल मॉडेल तयार करत आहे.