2 min read
0
0
62

no images were found

ब्राह्मण सभा करवीर  मंगलधाम पुरस्कृत महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुलां मुलीच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेमधून तन्मयी,चतुर्थी, मायशा, सिद्धांत, रुहान,विवान व कुशाग्र यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.                                                                               कोल्हापूर (प्रतिनिधी):- ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, बिनखांबी गणेश मंदिराजवळ,कोल्हापूर येथे ॲड.पी आर मुंडरगी स्मृती एच टू ई महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीनंतर मुलांच्या गटात चौथा मानांकित पुण्याचा सिद्धांत साळुंके ने आठ पैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले. दहावा मानांकित मुंबईचा रुहान माथुर ने सात गुणासह उपविजेतेपद संपादन केले. सातवा मानांकित कोल्हापूरचा विवान सोनी ने साडेसहा गुणासह तृतीय क्रमांक पटकाविला तर आठवा मानांकित नागपूरच्या कुशाग्र पालीवाल ने चौथे स्थान स्थान मिळविले . मुलींच्या गटात चौदावी मानांकित सातारची तन्मयी घाटे ने सात गुण मिळवून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. दहावी मानांकित पुण्याची चतुर्थी परदेशी ने साडेसहा गुणासह उपविजेतेपद मिळविले तर अग्रमानांकित मुंबईच्या मायशा परवेज ला साडेसहा गुण मिळवून ही कमी टायब्रेक गुणामुळे तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. या सर्वांची गोवा येथे तीन ते नऊ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या तेरा वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.                                             श्री महालक्ष्मी बॅंकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिराळकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूरचे खजिनदार आनंद माने, युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेस चे कॅप्टन उत्तम पाटील, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम चे अध्यक्ष डॉक्टर उदय कुलकर्णी, शाहू मॅरेथॉन व बिनखांबी गणेश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किसनबापू भोसले, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, महालक्ष्मी बँकेचे संचालक कृष्णा काशीद, राजन देशपांडे, श्रीकांत लिमये व संतोष कडोलीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगुले मनीष मारुलकर, धीरज वैद्य उत्कर्ष लोमटे, प्रीतम घोडके,अनिश गांधी व आरती मोदी उपस्थित होते. विजय माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून सांगलीच्या आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर यांची नियुक्ती महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने केली होती. त्यांना मनिष मारुलकर, करण परीट,आरती मोदी, रोहित पोळ,रवींद्र निकम, प्रशांत पिसे यांनी सहाय्य केले.                                                     *इतर मुख्य बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे* मुलांचा गट 5) शौनक बडोले नागपूर 6) आदित्य कदम मुंबई 7) श्लोक माळी पुणे 8) सहेजवीर सिंग मारस नागपूर 9) शाश्वत गुप्ता पुणे  10) आराध्य पार्टे ठाणे                                                 मुलींचा गट – 4) प्रिशा घोलप रायगड 5) सान्वी गोरे सोलापूर 6) परिधी गांधी बुलढाणा 7) भूमिका वागळे छत्रपती संभाजीनगर 8) कार्तिकी ठाकूर मुंबई 9) जैना नावोले अमरावती 10) ईश्वरी नाईक नाशिक                                                           *उत्तेजनार्थ बक्षीसे*                                       *सात वर्षाखालील उत्कृष्ट* मुले – 1) रिधान कारवा कोल्हापूर 2) हर्ष कांबळे कोल्हापूर 3) अद्वैत  कुलकर्णी कोल्हापूर   मुली- 1) प्रितिका नंदी.                                                                *नऊ वर्षाखालील उत्कृष्ट* मुले – 1) ईशान मदवारे पुणे 2) अन्वित गायकवाड अहिल्यानगर 3) अवनीश जितकर कोल्हापूर  मुली – 1) आदिना मोहाती पुणे 2) रीवा चरणकर सातारा 3) पृथा ठोंबरे सोलापूर                                         *अकरा वर्षाखालील उत्कृष्ट* मुले- 1) राघव पावडे पुणे  2) वरद पाटील सांगली 3) आराध्य ठाकूर देसाई कोल्हापूर  मुली – 1) देवांशी गावंडे छत्रपती संभाजी नगर 2) माधवी देशपांडे सांगली 3) हर्षदा पाटील कोल्हापूर

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…