Home क्राईम ‘जॉन्सन अँण्ड जॉन्सन बेबी पावडर’बाबत न्यायालयाकडून कंपनीला दिलासा नाही

‘जॉन्सन अँण्ड जॉन्सन बेबी पावडर’बाबत न्यायालयाकडून कंपनीला दिलासा नाही

0 second read
0
0
36

no images were found

जॉन्सन अँण्ड जॉन्सन बेबी पावडरबाबत न्यायालयाकडून कंपनीला दिलासा नाही

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या ‘बेबी पावडर’ या उत्पादनाला हानिकारक ठरवत अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र न्यायालयाने कंपनीला दिलासा दिलेला नाही.

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचे ‘बेबी पावडर’ हे उत्पादन अतिशय प्रसिद्ध आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या उत्पादनाविषयी वेगवेळ्या बाबी समोर येत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने १५ सप्टेंबर रोजी बेबी पावडरवर कारवाई केली. या पावडरमध्ये लहान मुलांना प्रतिबंधित करणाऱ्या घटकांचं प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतात, असं एफडीएचं म्हणणं आहे. त्यामुळे या पावडरवर बंदीची कारवाई करण्यात आली. मात्र या निर्णयाविरोधात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा निर्णय मनमानी आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे. आज हायकोर्टाने कंपनीचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर एफडीएने ज्या अहवालाच्या आधारे कारवाई केली तो कंपनीला उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिलेले आहेत. १९ नोव्हेंबरपर्यंत सुनावणीला स्थगिती दिलीय. एफडीएच्या बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे. दरम्यान, या प्रकरणी केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…