
no images were found
अहो आश्चर्य! ७ महिने रुग्णालयात कोमात असलेल्या महिलेने दिला लेकीला जन्म
नवी दिल्ली : येथील एम्स रुग्णालयात सुमारे ७ महिन्यांपासून रुग्णालयात बेशुद्धावस्थेत कोमात असलेल्या २३ वर्षीय महिलेने गेल्या आठवड्यात एका मुलीला जन्म दिला. ती मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. खरंतर, महिला बुलंदशहरची रहिवासी आहे. सात महिन्यांपूर्वी झालेल्या रस्ता अपघात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डोक्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यापासून ही महिला सात महिन्यांपासून रुग्णालयात बेशुद्ध पडून आहे.
डॉक्टरांनी सांगितलं की, मुलीला जन्म देणारी महिला ३१ मार्च रोजी रस्ता अपघाताची शिकार झाली होती. ती तिच्या पतीसोबत मोटारसायकल चालवत होती आणि यावेळी महिलेने हेल्मेट घातले नव्हते. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ती वाचली तरी ती बेशुद्धच राहिली. न्यूरोसर्जरी विभागाचे प्रोफेसर दीपक गुप्ता यांनी सांगितले की, महिला बेशुद्ध अवस्थेत आहे, तिने डोळे उघडले, परंतु तिला काहीही समजत नव्हते. म्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ती ४० दिवसांची गर्भवती होती. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या टीमने तिच्या प्रकृतीचा आढावा घेतला आणि बाळ पूर्णपणे निरोगी असल्याचं सांगितलं. गर्भधारणा करण्यासाठी धोका होता. यानंतर डॉक्टरांनी बाळाला ठेवायचे की नाही ठेवायचे याचा निर्णय रुग्णाच्या कुटुंबावर सोडला. यानंतर महिलेच्या पतीने बाळाचा गर्भपात न करण्याचा निर्णय घेतला बाळ सुखरूप आहे.