Home मनोरंजन ‘पुष्पा इम्पॉसिबल मालिकेने पूर्ण केले 1000 एपिसोड

‘पुष्पा इम्पॉसिबल मालिकेने पूर्ण केले 1000 एपिसोड

5 second read
0
0
28

no images were found

पुष्पा इम्पॉसिबल मालिकेने पूर्ण केले 1000 एपिसोड


सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेने एक मोठा टप्पा गाठला आहे. मालिकेने तब्बल 1000 एपिसोड पूर्ण केले आहेत. या मालिकेत पुष्पाची कहाणी सांगितली आहे. करुणा पांडे या अभिनेत्रीने पुष्पाची भूमिका साकारली आहे. पुष्पा एक करारी सिंगल मदर आहे. आपली कर्तव्ये पार पाडतानाही आपल्या स्वप्नांवर पाणी न सोडता ती साकार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्त्रीची ही कहाणी आहे.

आपली मुले जरा मोठी झाल्यानंतर पुन्हा शाळेत जाण्याचा निर्णय पुष्पा घेते, जो तिच्या जीवनातीलच नाही, तर भारतीय टेलिव्हिजनवरील एक टर्निंग पॉइंट ठरला. साचेबंदपणा मोडून सतत शिकत राहण्याचे महत्त्व या मालिकेने अधोरेखित केले. शिक्षण घेण्यासाठी, मुलांचे संगोपन करण्यासाठी, काम करण्यासाठी आणि अश्विन, चिराग आणि राशी या आपल्या तीन मुलांना वाढवण्यासाठी पुष्पाने केलेला संघर्ष या मालिकेत दाखवला आहे. समाजाकडून अवहेलना आणि आर्थिक ओढाताण तिने या काळात सहन केली. सुरुवातीला टिफिन पुरवण्याचे काम पुष्पा करत असे. आपल्या समुदायातील अन्यायाशी लढा देण्यापासून ते आता कायद्याच्या कॉलेजात शिक्षण घेण्यापर्यंत पुष्पाचा प्रवास स्थिर, अडचणींनी भरलेला आणि अद्भुत आहे.

मालिकेने गाठलेल्या या महत्त्वाच्या टप्प्याविषयी करुणा पांडे म्हणते, “पुष्पा जणू माझा एक भाग झाली आहे. तिची ताकद, तिची निरागसता आणि हार न मानण्याची वृत्ती मी अनेक वर्षे जगते, अनुभवते आहे. प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केले, त्या बळावर प्रत्येक दृश्य आणि आव्हान निभावून नेण्याची ताकद मला मिळाली. दररोज मी तिच्या हिंमतीमधून, हुशारीमधून आणि लढाऊ वृत्तीमधून काही ना काही तरी शिकत गेले. 1000 एपिसोड.. मी भावनावश झाले आहे, भारावून गेले आहे. मला तर हे स्वप्नवत वाटत आहे. जीवन पालटून टाकणारा हा प्रवास आहे. ही सुंदर आणि दमदार व्यक्तिरेखा मला दिल्याबद्दल, माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल जे डी सर, सर्व कलाकार, क्रू सदस्य आणि सोनी सब वाहिनीची मी ऋणी आहे.”

पुष्पा इम्पॉसिबल मालिकेचे निर्माते जे डी मजिठीया म्हणतात, “1000 एपिसोड पूर्ण करणे हा केवळ एक मैलाचा दगड नाही, लवचिकता, मालिकेचे कथानक आणि मालिकेने प्रेक्षकांशी जोडलेले नाते याचा हा पुरावा आहे. पुष्पा इम्पॉसिबल मालिकेची सुरुवात पुष्पाची कहाणी सांगणारी कथा अशी झाली होती. पुष्पा एक उत्साही, खंबीर स्त्री आहे, जी जीवनातील आव्हानांचा सामना दृढतेने आणि सकारात्मकतेने करते. हळूहळू ही मालिका केवळ एक टेलिव्हिजन मालिका राहिली नाही. लक्षावधी प्रेक्षकांचे संघर्ष, आशा आणि विजय यांचे प्रतिबिंब या मालिकेत दिसू लागले.”

 प्रोफेसर शास्त्रीची भूमिका करणारा गौरव चोप्रा म्हणतो, “मी या मालिकेत तसा अलीकडेच दाखल झालो असलो, तरी ‘पुष्पा इम्पॉसिबल’ची ऊर्जा आणि आपलेपणा यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून मला अगदी घरी असल्यासारखे मोकळे वाटले. भावना आणि बुद्धी यांचे इतके संतुलित सादरीकरण करणारी मालिका क्वचितच दिसते. ही मोठी सिद्धी साजरी करताना मी या मालिकेचा भाग असल्याचा मला गौरव वाटतो. ही टीम एकत्र मिळून पडद्यावर कशी जादू करते, हे मी आता प्रत्यक्ष बघत आहे.”

 मालिकेने 1000 भाग पूर्ण केले आहेत आणि पुष्पाची व्यक्तिरेखा आजही तितकीच ठसठशीत आहे, केवळ एक व्यक्तिरेखा म्हणून नाही, तर देशातील महिलांसाठी आशा आणि सशक्तीकरणाचे प्रतीक म्हणून!

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…