no images were found
“आम्ही तुमची कहाणी फक्त ऐकणार नाही, तर समजूनही घेऊ.“
जुही परमार यांचा विश्वास आहे की ‘कहानी हर घर की’ चा टोल-फ्री क्रमांक प्रत्येक त्या स्त्रीसाठी ‘लाईफलाईन’ आहे जिला खरंच कुणीतरी मनापासून ऐकून घेणे आवश्यक आहे!
प्रत्येक घरात एक कहाणी असते — काही साजऱ्या केल्या जातात तर काही अनेकदा ऐकल्याही जात नाहीत. आपल्या नवीन ‘आपका अपना झी’ या ओळखीसह झी टीव्ही सादर करत आहे ‘कहानी हर घर की’ — एक मन हेलावून टाकणारा नॉन-फिक्शन फॉरमॅट, जो भारतीय महिलांना त्यांच्या अनेकदा न बोलल्या गेलेल्या सत्यांना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित, आधार देणारी जागा देतो. भावनिक दुर्लक्ष, सामाजिक दबाव, वैवाहिक आव्हाने किंवा करिअरमधील तडजोड — या सर्वांवर प्रामाणिक आणि निःपक्षपाती संवादाचे दार उघडते. प्रत्येक भागात एका शक्तिशाली वास्तविक कहाणीला तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि सेलिब्रिटी पाहुण्यांच्या दृष्टिकोनाची जोड दिली जाईल. आपल्याला आठवण करून दिली जाईल की काही कहाण्या फक्त सांगण्यासाठीच नव्हे, तर खर्या अर्थाने ऐकल्या जाण्यासाठीही पात्र असतात.
करुणेने भरलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमाने टोल-फ्री क्रमांक – 18001212671 सुरू केला आहे, ज्यावर कोणीही निर्भयपणे आणि निःपक्षपातीपणे आपली समस्या सांगू शकतो. या कॉलच्या दुसऱ्या बाजूस यंत्र नसेल, तर एक खरी व्यक्ती असेल – जी संयम, ऊब आणि सहानुभूतीने ऐकेल, आणि कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच मनापासून ऐकले गेल्याची दिलासा देणारी भावना देईल. कॉल करणारे आपले मन मोकळे करून फक्त खासगीपणे बोलणे निवडू शकतात किंवा राष्ट्रीय दूरदर्शनवर आपली कथा मांडण्यासाठी नोंदणी करू शकतात. हा साधा पण अर्थपूर्ण टप्पा प्रत्येक आवाजाला – तो कितीही दबलेला असो – ऐकले जाण्याची जागा, सन्मान आणि धैर्य प्रदान करतो.
जूही परमार म्हणाल्या, “‘कहानी हर घर की’सोबत आम्हांला फक्त एक शो बनवायचा नव्हता, तर एक असे सुरक्षित स्थान निर्माण करायचे होते जिथे खरंच ऐकून घेतले जाते. टोल-फ्री नंबर हा तुमच्यासाठी पहिले पाऊल उचलण्याची संधी आहे. जेव्हा कोणी कॉल करतो, तेव्हा त्यांना यंत्र नव्हे तर एका खऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकायला मिळतो, कारण प्रत्येक आम्हांला ऊब, संयमासह समजून घेणे आवश्यक असते. अनेकांसाठी हा पहिलाच अनुभव असतो जिथे त्यांना खरंच कोणी आपले ऐकत आहे असे जाणवते. म्हणूनच ही संकल्पना माझ्या मनाच्या खूप जवळची आहे, हे फक्त एक व्यासपीठ नाही, तर एक जीवनरेषा आहे. एक साधीशी बातचीतही तुम्हांला हे जाणवून देऊ शकते की कुणीतरी तुमच्याशी काळजीपूर्वकपणे जोडलेले आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या नंबरवर कॉल करता, तेव्हा तुमचा एकटेपणा नाहीसा होतो. तिथे आम्ही तुमच्या सोबत असतो. आणि इतकंच नाही, तर त्या नंबरवर कॉल करून काही लोकांना या शोचा भाग होण्याची संधीही मिळू शकते.”
लवकरच झी टीव्हीवर प्रीमिअर होत असलेला ‘कहानी हर घर की’ हा केवळ एक शो नसून, हृदयाला स्पर्श करणारा एक दैनंदिन अनुभव ठरणार आहे. कारण प्रत्येक घरात एक कहाणी असते. आणि काही कहाण्या ऐकल्या गेल्याच पाहिजेत.